बातमी

मुरगूडच्या श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडीत शानदार उदघाटन

उदघाटन प्रसंगी ५० लाख ठेवीचे संकलन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी व सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली२ कोटी५२ लाख७१ हजारावर ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा व१०० कोटींचा ठेवीचा टप्पा पार करणारी श्री लक्ष्मीनारायण नागरी-सहकारी पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचा उद्घद्याटन सोहळा शेळेवाडी ता . राधानगरी येथे रविवार सकाळी दि .२८ / ०४ / २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला .
मुरगूड येथिल मुख्य शाखेसह कूर ( ता. भुदरगड ) , सरवडे ( ता. राधानगरी ) , सावर्डे बु॥ ( ता. कागल ) , व सेनापती कापशी ( ता. कागल ) , या शाखा कार्यरत आहेत. आता शेळेवाडी येथे नवीन शाखा सुरु होऊन कार्यरत राहणार आहे.

या नवीन शाखेचे उदघाटन जेष्ठ संस्थापक संचालक मा . श्री . जवाहर शहा यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले . तर संस्थेच्या नामफलकाचे अनावरण संस्थेचे विद्यमान चेअरमन मा . श्री . किशोर पोतदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
कार्यक्रमात मॅनेजर केबिन मा . अनंत फर्नांडिस , कॅशिअर केबिन मा . दत्तात्रय कांबळे , लॉकर्स केबिन मा . रविंद्र खराडे , संगणक प्रणाली उदघाटन पुंडलिक डाफळे तसेच ठेव पावतींचे वितरण संचालक चंद्रकांत माळवदे (सर ) , जगदिश देशपांडे साहेब, विनय पोतदार , संचालिका सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन पोतदार म्हणाले संस्थेच्या दैदित्यमान यशात सभासद , ठेवीदार , हितकांचे सहकार्य मोलाचे आहे . त्यामुळेच १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे . या सर्वांच्या विश्वासास पात्र राहून व कार्यतप्तर संचालकांच्यामुळे श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था उत्तरोत्तर गरुडझेप घेऊन प्रगतीपथावर येत आहे. असेच संस्थेविषयी प्रेम , आपुलकी , जिव्हाळा शेळेवाडी व परिसरातू भरभरून मिळेल अशी भावनां यावेळी त्यानी व्यक्त केली .
संस्थेचा धावता आढावा जेष्ठ संस्थापक संचालक श्री . जवाहर शहा यानीं घेतला . यावेळी जेष्ठ संचालक पुंडलिक डाफळे , श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन किरण गवाणकर , शेळेवाडीचे सरपंच प्रविण पाटील यानीं आपल्या मनोगतात संस्थेविषयी गौरव उदगार काढले . यावेळी पहिल्याच दिवशी ५० लाख ठेवीचे संकलन झाले.

या उदघाटन प्रसंगी श्री .लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे पदाधिकारी ,श्री . व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर , संदिप कांबळे , निवास कदम , कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर ,लक्षीनारायण पतसंस्थेचे कार्यकारी संचालक नवनाथ डवरी यांच्यासह सुरेश जाधव, आकाश रेंदाळे , सभासद , ठेवीदार, कर्मचारी वर्ग , मान्यवर , हितचिंतक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संचालक विनय पोतदार यानीं तर आभार अनंत फर्नांडिस यानीं मानले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत माळवदे सर यानीं केले.

One Reply to “मुरगूडच्या श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडीत शानदार उदघाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *