बातमी

मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव, मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत. या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरहून येणारी शेवटची बस […]

बातमी

पर्यटन क्षेत्रात महिलांना आई योजनेची साथ

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): राज्‍य शासनाच्या पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत पर्यटन व्यवसायासाठी महिला उद्योजकांना नवीन प्रकल्पासाठी बँक 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर करुन देत असून त्या कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम (12 टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज परतफेड होणार आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात […]

बातमी

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात गुरुवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा

सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या […]

बातमी

हळदवडेत लोकप्रतिनिधींना गावबंदी व मतदान बहिष्कारचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी चा फलक हळदवडे गावातील वेशीवर लावून गावातील मराठा समाज इथून पुढील सर्व निवडणुक मतदान मध्ये बहिष्कार टाकत असले बद्दलचा हळदवडे गावचा दसरा सिमोलंघन ग्रामसभे मधील सामूहिक निर्णय सामजिक कार्यकर्ते व ग्रा. प. सदस्य, बैठकीचे अध्यक्ष नामदेवराव भराडे तसेच साताप्पा काशीद, केराबा अस्वले, […]

ताज्या घडामोडी

मुरगूड ग्रामीण रुग्णालयास  ५० बेडसाठी मंजूरी !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयास खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामूळे ५० बेडला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.             मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत २५ ते३० गावांतील रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता या रुग्णालयाचे विस्तारीकरण व्हावे अशी अनेक दिवसापासून मागणी  होती. या संदर्भात रुग्णालयाचा ५० […]

collector
बातमी

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 18 ऑगस्टची अभ्यागत भेटी रद्द

कोल्हापूर, दि. 17 : प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत. या दिवशीच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी

जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे टप्पा 2.0 अभियानांतर्गत पूर्ण होणार

कोल्हापूर : जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे पूर्ण होवून बराच कालावधी होवून गेल्यामुळे या कामांची परिरक्षा, दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी येणारा खर्च जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान 2.0 सदस्य सचिव यांनी दिली आहे. […]

बातमी

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ कोल्हापूर, दि. 21 : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश […]

बातमी

हुपरी परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) विक्रीस तात्काळ आळा घाला, अन्यथा शिवसैनिक याचा बंदोबस्त करतील – जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

हुपरी : हुपरी व परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) सेवन व राजरोसपणे सुरू असलेल्या विक्रीस तात्काळ आळा घालावा व या जाळ्यात सामील असणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना कठोर शासन करावे. अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेवून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करेल, अशा आशयाचे निवेदन शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व पदाधिकारी यांनी स.पो.नि. पंकज गिरी हुपरी पोलीस ठाणे यांना दिले. […]

बातमी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला शिवाजी विद्यापीठाच्या विधी विद्यार्थ्यांनी दिली भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास भेट देऊन ‘मध्यस्थी’ विषयावर पथनाट्य सादरीकरण केले.  कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रीतम पाटील, विद्यापीठाचे विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष विवेकानंद घाटगे, कौटुंबिक न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील  उपस्थित होते. डॉ. धूपदाळे यांच्या हस्ते जिल्हा […]