बातमी

मुरगूड येथील व्यापारी नागरी व लक्ष्मीनारायण पतसंस्थेत शाहू महाराजानां अभिवादन

मुरगूड (शशी दरेकर) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृतीदिनानिमित्य आज शनिवारी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन छत्रपती शाहू महाराजानां अभिवादन करण्यात आले.

शाहू महाराजानी उत्तम राज्य चालवण्याबरोबर सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळावे, दलितानां सर्वाधिकार मिळावेत, त्याचबरोबर मानसन्मान मिळावा, मुलींचे शिक्षण , मराठा समाजाला आरक्षण मिळावे, विधवा व्यवस्था असे अनेक सामाजिक सुधारनेसाठी त्यानी प्रयत्न केले. त्यांचे विचार व त्यांचे कार्य प्रत्येकांच्या स्मरणात कायमपणे तेवत राहतील.

अशा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अभिवादन प्रसंगी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात चेअरमन किरण गवाणकर, संचालक प्रशांत शहा, नामदेवराव पाटील, शशी दरेकर, प्रदिप वेसणेकर, किशोर पोतदार, यशवंत परीट, प्रकाश सणगर, संदिप कांबळे, कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर, सुरेखा डवरी, स्वाती पाटील, सीमा मगदूम, नितीन पाटील, विनायक हजारे, देवराज कांबळे, दत्तात्रय कुलकर्णी तसेच सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह पतसंस्थेत अभिवादन प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. पुंडलीक डाफळे सर, कार्यकारी संचालक नवनाथ डवरी, तुकाराम दाभोळे, जनार्दन सापळे, आशिष जाधव , लता कुंभार, विक्रम हुल्ले, मधूकर शिंगे, धोंडीराम पाटील, दत्तात्रय परीट, विनायक वंदुरे, आदिसह पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *