साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जीवन संघर्षमय व वेदनेने भरलेले होते – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) : अण्णाभाऊ साठे त्यांचे जीवन संघर्षमय आणि वेदनेने भरलेले होते ते क्रांतिकारी साहित्यिक होते असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ या कार्यक्रमात बोलत होते. ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण लेखन हे शोषितांच्या आणि वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लिहिले. त्यांच्या संपूर्ण लेखनात माणूस आणि माणसाचे जीवन केंद्रवर्ती राहिले. त्यांच्या कथा, कादंबरी मधून उपेक्षित समाजाचा आलेख वाचकांसमोर आला.

Advertisements

            याप्रसंगी  प्रा. दादासाहेब सरदेसाई तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. आर फराकटे प्रा. दिपाली सामंत यांनीही मनोगते व्यक्त केली.

Advertisements

        या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सुखदेव एकल यांनी केले. आपल्या प्रस्ताविकेत ते म्हणाले की लेखन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वैचारिक वारसा घेऊन आजच्या काळामध्ये वैचारिक लेखन केले पाहिजे.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना कांबळे यांनी केले तर आभार प्रा. नूतन बिरंबोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक डॉ. माणिक पाटील प्रा. एम.एच.सोहनी, प्रा. दीपक साळुंखे, प्रा. विनोदकुमार प्रधान,प्रा. दिगंबर गोरे, प्रा. आर.एस. पाटील, प्रा.नीतेश रायकर, प्रा.गुरुनाथ सामंत, प्रा. सोनाली कुंभार, प्रा. अशोक पाटील, प्रा. मनिषा पाटील,  प्रा. राहूल बोटे, प्रा. सुशांत पाटील, प्रा.धनाजी खतकर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!