ज्येष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Advertisements

       अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अशोक डवरी यांनी व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस किशोर पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पी डी मगदूम, सचिव सखाराम सावर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मुख्याध्यापक अशोक डवरी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला तर प्रा.किशोर पाटील यांनी लोकमान्य टिळक यांचा जीवनपट उलगडून सांगितला.

Advertisements

यावेळी  मनोहर सासणे, जयवंत हावळ, सिकंदर जमादार ,मारुती रावण, शंकर रावण, रामचंद्र रणवरे, दादू मडीलगेकर, बाबुराव कापसे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदाशिव एकल यांनी आभार मानले.

.

Leave a Comment

error: Content is protected !!