बातमी

वाघापूरात प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांचे नूतनीकरण व लोकार्पण सोहळा संपन्न

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आमदार फंडातून प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावतील वर्ग खोल्यांचे नूतनीकरण व सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत जनसंपर्क अधिकारी डी.डी. पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

यावेळी बोलताना बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे‌ म्हणाले आमदार सतेज पाटील यांच्या आमदार फंडातून तालुक्यात लाखो रुपयांची विकास कामे सुरू असून सांस्कृतिक हॉल, रस्ते, पूल, साकव आदि कामांसाठी वाघापूरला तब्बल 70 लाख रुपयांचा भरीव निधी दिला असून विकास कामांची ही गंगा अव्ययातपणे सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात गुण तालिका क्रमवारीत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा जनसंपर्क अधिकारी डीडी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच बापूसो आरडे, कामगार सेलचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, धनाजी बर काळे, बाळासो दाभोळे, भुजंगराव मगदूम, युवा नेते अमर बरकाळे, दिलीप आरडे, प्रदीप कुरडे, वैभव दाभोळे, सुशांत माळवी, उदय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व तरुण मंडळाचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *