पिंपळगाव खुर्द : व्हन्नूर ता. कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव यशवंतराव निकम होते.
पुढे ते म्हणाले,काळम्मावाडी धरणाच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणारे तसेच भारतीय संविधानावरती ज्या मोजक्याच महान व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामध्ये देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांची स्वाक्षरी आहे यावरून त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते.
यावेळी रामचंद्र रेवडे,विष्णू खोत,राजश्री इंगवले,बाजीराव पोवार,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जे.एन.सावंत यांनी केले सूत्रसंचालन एन.सी.यादव यांनी केले तर आभार एस.आर.गुरव यांनी मानले.