बातमी

मुरगूड येथे भारत बंदला तुरळक प्रतिसाद


ऐतिहासिक हु.तुकाराम भारमल चौकात शेतकरी कामगार विरोधी केंद्र शासनाचा निषेध


मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या व कृषी विरोधी धोरणांचा निषेध करत मुरगूड ता. कागल येथील विविध परिवर्तनवादी,पुरोगामी पक्ष व संघटनांनी भारत बंदला पाठिंबा व्यक्त केला.
अखिल भारतीय शेतकरी संघटनांच्या वतीने अन्यायी कृषी बिल विरोधातील आंदोलन व भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते.समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यावेळी विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी येथील ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम भारमल चौकात जमा झाले होते .यावेळी केंद्राच्या अन्यायी कृषी कायद्यांचा धिक्कार करण्यात आला केंद्र भाजप व मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अखिल भारतीय किसान सभा ,भारतीय ट्रेड युनियन केंद्र अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व यूपीए घटक पक्ष यांच्यासह पूर्ण देशातील शेतकरी पक्ष संघटना डावे पक्ष संघटना पुरोगामी व प्रागतिक विचारांच्या पक्ष संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ पाठिंबा देण्यात आला.

यावेळी बोलताना दलितमित्र डी डी चौगुले म्हणाले “केंद्र शासनाच्या भांडवलदारी पुरस्कृत धोरणाचा परिणाम गोरगरिबांच्या पाण्यावर झाला आहे. त्या विरोधात लोकांचे संघटन होणे आवश्यक आहे.”

कॉम्रेड अशोक चौगले म्हणाले,’ गेल्या नऊ महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलक जीवाची पर्वा न करता आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार या या आंदोलनास आपण पाठिंबा दिला नाही तर भविष्यकाळ आपल्यास माफ करणार नाही.”

बी.एस.खामकर म्हणाले ,”लहानसहान जीवनावश्यक वस्तूंवर कर लादून कामगारांचे संघटन व त्यांचे घटनात्मक हक्क मोडुन पिळवणूक करत आहे”.

स्वागत व प्रास्ताविक समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष कॉ बबन बारदेस्कर यांनी केले.आभार प्रदीप वर्णे यांनी मानले

आजच्या निषेध मोर्चात शेतकरी संघटना ,शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ,समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड , कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ,संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा मुरगुड ,लाल बावटा कामगार संघटना ,श्रमिक संघटना,बेघर संघटना , विद्रोही साहित्य चळवळ यांनी सहभाग घेतला. यावेळी मुरगूड शहर शिवसेनेचे अध्यक्ष व नगरसेवक नामदेवराव मेंडके, दलित मित्र दत्ता चौगले,कॉम्रेड अशोक चौगले,दिग्विजय पाटील,मधुकर मसवेकर,उद्योजक जोतीराम सुर्यवंशी, संजय दबडे , बी.एस.खामकर, डी.एस. घाटगे, प्रदिप वर्णे , संदिप खंडागळे ,डॉ.सुनिल चौगले,रामचंद्र चौगले,दत्तात्रय मंडलिक ,जगदीश गुरव,सुरेश पाटील,गणपती मांगोरे,साताप्पा डेळेकर,सुखदेव खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *