बातमी

मुरगुड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या प्रसाद व वास्तुशांती विविध धार्मिक विधी संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तू शांत सोहळ्याच्या आजच्या हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये कुमारिका पूजन पंचकन्या सवाष्ण पूजन विधी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पार पडले. यानंतर मंदिर प्रांगणामध्ये गोमातेचे पूजन करण्यात आले.

मंदिरावरती उभारण्यात येणाऱ्या कलशाचे धार्मिक विधी आणि दूध पंचामृत, मृत्तिका, औषधी जल, मध आदी घागरींच्या मधून कलशाला अभिषेक घालून विधिवत अभिषेक संपन्न करून ते मंदिरामध्ये आणण्यात आले. त्यानंतर सौभाग्यवतींच्या वतीने कलशाचे पूजन करण्यात आले .आजच्या गणेश जयंतीचे औचित्य साधून अंबाबाई मंदिरातीलच स्थित श्री गणेशाच्या गणेश याग करण्यात आले त्यानंतर विविध पीठस्थदेवता आवाहन, स्थापना, (ब्रह्मादिमंडल, रुद्रमंडल, वास्तुमंडल, ग्रहमंडल), जलाधिवास (सर्वौषधिस्नान), पुष्पाधिवास, शैय्याधिवास इत्यादी धार्मिक विधी मोठ्या पवित्र आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले.

आजच्या दिवशी तुकाराम चौक, शाहीर आण्णाभाऊ साठे नगर, संपूर्ण कापशी रोड, सर्व कॉलनी शाहूनगर, आंबेडकर नगर, गुरव कॉलनी, बाळुमामा कॉलनी, जांभूळ खोरा व चिमगांव रोड उर्वरीत मुरगुड शहराच्या या भागातील गारवा मंदिरास मोठ्या उत्साहात आणण्यात आला .यावेळी पाच बैलगाडीच्या मधून हजारो नागरिक गारवा घेऊन मंदिराकडे आले. मुरगूड शहरातील परिसरातील हजारो लोकांनी गारव्याच्या या महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी मुरगुड येथील माहेरवासीन नागरिक आणि परिसरातील भावीक भक्त नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या श्री अंबाबाई मातीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. चार दिवस उत्साहात चालणाऱ्या या सोहळ्यास भाविक भक्तांची गर्दी वाढत चालली आहे.

शनिवारी २८ जानेवारी रोजी सुमारे २५ ते ३० हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत . तसेच या दिवशी मुरगूड शहरातील पाच ते सहा हजार माहेरवाशीन देखील ओटी भरण्यासाठी मंदिरात येणार आहेत.

आतापर्यत झालेल्या कार्यक्रमाचे ज्यांनी हे कार्य पार पाडले ते ब्रह्मवृंद उमेश जोशी, महेश जोशी, केदार जोशी, नागेश जोशी, पवन वेढे इत्यादी ब्रह्मवृदांच्या हस्ते आणि मंत्र उच्चाराने मुरगुड मधील अनुबोध गाडगीळ, राहुल कुलकर्णी, विलास जोशी, किरण जोशी अरुण जोशी, दीपक बहुध्याने इत्यादी स्थानिक पूरोहित आणि मुरगुडच्या अंबाबाईचे गुरव पुजारी विशाल भगवान गुरव भगवान हरिभाऊ गुरव ,उमेश विश्वनाथ गुरव, जगदीश विश्वनाथ गुरव, स्वप्निल शंकर गुरव ,सागर शंकर गुरव यांच्या सहकार्याने मंदिरातील सर्व धार्मिक विधी पार पडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *