वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३९ दिनांक ९-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

निधन : एम. व्ही. कांबळे

मुरगूड,ता.८ : येथील दलितमित्र एम.व्ही.कांबळे (वय ७९ ) यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत. त्यांच्या मागे,पत्नी, मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.९) आहे.

निधन वार्ता – यशवंत पोवार

श्रीपेवाडी ता. निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत जानबा पोवार ( वय ८९ ) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. ८/६/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९/६/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीपेवाडी येथे आहे.

तामगाव ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पुजारी अपात्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील तामगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विठ्ठल पुजारी यांना शाळेच्या सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८-कलम १४ नुसार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तामगाव येथील हेमंत राजेंद्र पाटील, अनिल शिवगोंडा पाटील आणि प्रकाश बंडू जोंधळेकर … Read more

मुरगूडात राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

नाचणारा घोडा, ध्वज पथक, मर्दानी खेळ आणि लाईट शो ठरले खास आकर्षण मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड शहर येथील संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समिती मुरगूड यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. यंदाचे हे चौथे वर्ष दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा हजारो लोकांच्या गर्दीमध्ये उत्साहात संपन्न झाला. पश्चिम … Read more

कोल्हापुरात शिवरायांच्या कर्तृत्वाला जिवंत देखाव्यातून उजाळा

कोल्हापूर, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील एक महत्त्वाचा अध्याय, शिवराज्याभिषेक दिन, आज कोल्हापुरात कागलकर वाड्याच्या प्रांगणात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची स्थापना करण्यात आली, जी शिवरायांच्या सार्वभौमत्वाची आणि रयतेच्या कल्याणाची प्रतीक आहे. सनई आणि पोवाड्यांच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य … Read more

सांगाव येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ‘महाबीज’ सोयाबीन बियाणे वाटप; शेतकऱ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर: कागल तालुक्यातील सांगाव येथे शुक्रवारी कृषी विभागामार्फत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फुले किमया या उन्नत सोयाबीन वाणाच्या ‘महाबीज’ बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व … Read more

वृक्षवाढदिवस, रोपांचे वाटप, वृक्षारोपण व बियांची हवाई पेरणी आदी उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा

निसर्ग मित्र मंडळाचा सातत्यपूर्ण २९ वर्षे उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी  वृक्षांचा वाढदिवस, रोपांचे वाटप व परिसरातील डोंगर माथ्यावर बियांची हवाई पेरणी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मुरगूड नगर परिषदेचे आरोग्य विभाग व आस्थापना विभाग … Read more

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला; आता शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आता अवघ्या ८ तासांत कापता येणार आहे. या प्रसंगी बोलताना, समृद्धी महामार्गाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत, आता शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री … Read more

बोगस डीएपी खताच्या वाढत्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची गरज: शेतकऱ्यांनो, सावधान !

मुंबई: सध्या शेतीत वापरल्या जाणाऱ्या डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतामध्ये भेसळ आणि बोगस खतांची विक्री वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पिकांच्या उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होत आहे. कृषी विभागाला यावर तातडीने लक्ष देण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बोगस डीएपी खत ओळखायचे कसे? शेतकऱ्यांनी डीएपी खत खरेदी करताना … Read more

error: Content is protected !!