विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
कागल (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ जाहीर करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कागल येथील ‘स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक आश्रम विद्यालय’ येथे लहान मुलांना वारकरी पोशाख, फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


तसेच, ‘विद्या मंदिर, बामणी’ येथील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मदत होईल. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केवळ घोषणाबाजी न करता थेट समाजातील घटकांना मदत पोहचवण्याचा संकल्प या सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी सुमित पाटील, तेजस चौगुले, गौरव बोबाटे, चिरायू संकपाळ, संकेत चितारी, धीरज पाटील, शर्विल सामंत, रोहित पाटील, विनायक घाटे यांच्यासह इतर कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.