औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला’ (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे आयोजित केला असल्याची माहिती मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य महेश आवटे यांनी दिली. मेळाव्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान 50 नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. … Read more

शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजची साक्षी गोरूले हिची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागाची विद्यार्थिनी साक्षी अशोक गोरूले हिची येत्या १९ डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या महावीर कॉलेजवर होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वानदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिद्धनेर्ली येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ४६ ते ४९ वजनगटात तीने अजिंक्यपद पटकावल्याने तिची या स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

मुरगूडमध्ये वाढीव घरफाळा निषेधार्थ भाजप व मुरगूडवाशिया तर्फे नगरपरिषदेवर मोर्चा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील मिळकतधारकांच्या मालमत्ता करात (घरफाळा) प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपच्या व मुरगूडवाशियांच्या वतीने मुरगूड नगरपालिकेवर मोर्चा काढून घरफाळा वाढीस विरोध दर्शविण्यात आला. दर चार वर्षांनी होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मुरगूड शहरातील घरांना घरफाळा आकारणी करण्यात आली आहे. घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा वर्गीकृत रचनेद्वारे ही आकारणी करण्यात आली आहे. मात्र ती … Read more

मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरीच्या मु .तिट्टा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सर्वांच्या परिचयाची व विश्वसनिय पतसंस्थेच्या मुदाळ तिट्टा शाखेचा १७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.सकाळी सौ .व श्री . प्रकाश धों. सणगर यांच्या शुभहस्ते ” श्री . सत्यनारायण पूजा पार पडली. सभासद, ठेवीदार, हितचिंतकानीं यावेळी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री. व्यापारी नागरी सह . … Read more

डॉ. बाबासाहेबांच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल केली असती तर आजचा दिवस वेगळा दिसला असता – प्रा. डॉ. पी. एस कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड ता . कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा . डॉ . पी . एस कांबळे हे डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या विचारांचे मंथन करत असताना ते म्हणाले की … Read more

शेवगा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवडीसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे. योजनेच्या अटी व शर्थी – फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. अर्जदाराकडे स्वमालकीची … Read more

सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी – प्रधानमंत्री पीक विमा योजना

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे प्रधानमंत्री पीक विमा (PMFBY) योजनेचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी … Read more

मित्राच्या खुनाबद्दल दोघांना जन्मठेप

कागल येथील २०१९ मधील घटना कागल : कागल येथे २०१९ मध्ये झालेल्या मित्राच्या खुनाबद्दल न्यायालयाने आज दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिद्धेश कुशनचंद चव्हाण (वय २९, रेल्वेलाइन, ठाकरे चौक, कागल) आणि वैभव अमरसिंग रजपूत (२६, जुनी बस्तीगल्ली, कागल, अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी हा निकाल दिला. यामधील आणखी एक … Read more

शिस्तबद्ध निवडणूकीसाठी हवेत शेषन सारखे अधिकारी

या देशातील जनतेने आणि पुढारी लोकांनी टी. एन. शेषन सारख्या जबरदस्त अधिकार्‍यांचा शिस्तबद्ध कामाचा बडगा पाहिला आहे. शेषन हा भला माणूस होता. देशातील निवडणूकामध्ये शिस्त असावी अशी जबरदस्त इच्छाशक्ती असलेला निर्भय अधिकारी. आपल्या कडक शिस्तीखाली अनेक निवडणूका घेऊन स्वत:चे वलय निर्माण केलेला एक जबरदस्त अधिकारी होऊन गेला. देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानापेक्षा लोकप्रियता मिळविण्यामध्ये शेषन यशस्वी … Read more

इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेस विरोध अन् पर्याय !

अलिकडे इचलकरंजी शहरात राहणार्‍या लोकांच्यासाठी पिण्याचे पाणी दूधगंगा नदीतून घेण्यावरून मोठा संघर्ष सुरू आहे. पंचगंगेच्या प्रदुषित पाण्यापेक्षा दूधगंगेतील पाणी थोडेसे चांगले असे वाटत असल्याने ही मागणी होत असावी. दुसरी बाजू अशी आहे, नियोजित योजनेनुसार इचलकरंजीवासियांना दूधगंगेतील पाणी देण्याने नदीकाठच्या शेतीला पाणी कमी पडणार यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार. या भूमिकेतून या प्रस्तावित योजनेला विरोध करण्यासाठी … Read more

error: Content is protected !!