मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेवाचा जन्म काळ मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला. सकाळी 7.30 वाजता जन्म काळ सोहळा पार पडल्यानंतर महिलांनी पाळणा गीते गाऊन वातावरण भक्तीमय केले यावेळी झेंडूंच्या फुलांची आकर्षक आरास तसेच बिरदेवाची आकर्षक बैठी पूजा कृष्णा डोणे यांनी मांडली होती.
यावेळी ढोल कैताळाच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता फुलांच्या वर्षावात जन्मकाळ सोहळा पार पडल्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाकणूक कार कृष्णात डोणे पुजारी, बाबुराव डोणे पुजारी, भगवान डोणे पुजारी, सिद्धार्थ डोणे पुजारी, बिरदेव डोणे, मायाप्पा डोणे, जगन्नाथ डोणे, यांच्यासह सर्व पुजारी वर्ग, भाविक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते