बातमी

सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी कागलमध्ये कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन कागलमध्ये दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 09.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह तहसिल कार्यालय, कागल येथे होणार आहे.

मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशिल व संपूर्ण माहिती घेऊन या सर्व योजनांचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग राज्य स्तर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग,जिल्हा रेशीम कार्यालय,मत्स्य व्यवसाय विभाग, दुग्धविकास विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था,महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापुर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) कोल्हापुर, व आरसेटी कोल्हापुर इत्यादी विभाग असणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जदारांनी आपले जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादि कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत सोबत घेऊन स्वत; उपस्थित राहावे. संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागांच्या योजनाबद्दल माहिती सविस्तरपणे देतील. माहिती पत्रक व कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देतील तसेच आवश्यकतेनुसार त्याच ठिकाणी कर्ज प्रस्ताव दाखल करून घेतील किंवा उर्वरित कागदपत्राबद्दल मार्गदर्शन करतील. शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली त्याच वेळी मिळणार आहे.याकरीता,कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, कोल्हापूर यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

One Reply to “सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांसाठी कागलमध्ये कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

  1. Simply desire to say your article is as surprising.
    The clearness to your post is just cool and i could suppose you are an expert in this subject.
    Well together with your permission let me to seize your feed to stay up to date with forthcoming post.
    Thanks one million and please continue the gratifying work.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *