बातमी

ग्रामपंचायत निवडणुकींच्या अनुषंगाने मुरगूड पोलीसस्टेशन हद्दीतील गांवात संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीस हद्दीतील सेनापती कापशी, जैन्याळ,
हमीदवाडा, बोरवडेसह१९ गावांमध्ये मुरगूड पोलीस स्टेशनकडील २ अधिकारी व १० अंमलदार आणि इस्पूर्ली पोलीस स्टेशनकडील ६ अंमलदार व३शासकीय वाहनासह संचलन करण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान संवेदनशील गांवावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. निवडणूकीसाठी पोलीस प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. आचारसंहितेचे पालन करावे, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असल्याचे मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे यानीं सांगितले.

गावातील एकता आबाधित ठेवण्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरणात व पोलीस प्रशासनाला मदत करून या ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पाडा असे आवाहनही ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर बडवेसो यानीं केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *