collector
बातमी

बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिमची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी – जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर, दि. 14 : गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो. ज्या भागातील मुलांनी गोवर प्रतिबंधात्मक लस घेतली नाही अशांमध्येच प्रामुख्याने हा आजार दिसून आल्यामुळे राहीलेल्या बालकांना लसीकरणासाठी नियोजन करण्यात आलेले असून, नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी गोवरची लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

        जिल्ह्यात गुरुवार दि. 15 डिसेंबर पासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिली. पहिली मोहिम 15 ते 25 डिसेंबर 2022 व दुसरी मोहिम 15 जोनवारी ते 25 जानेवारी  2023 या कालावधी मध्ये घेण्यात येणार आहे.

            जिल्हयामध्ये गोवर लसीचा पहिला डोस चे  शिल्लक 142 लाभार्थी आहेत दुसरा डोस चे  शिल्लक 159  मुले आहेत.  या मुलांना नियमित लसीकरण सत्रासोबत लस दयायची आहे.  तसेच 9 ते 12 महिने पहीला डोस व 16 ते 24 महिने दुसरा डोस चे असलेले सर्व लाभार्थीनां लस देणेचे नियोजन केले आहे.

गोवर आजारामध्ये विविध लक्षणे आढळून येतात उदा. ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोवरची लक्षणे आहेत.गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर 3 ते  7 दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

            गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व कुपोषण अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते, गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो.  बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

            लसीचा पहिला डोस बालक नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *