कृषी

किसान कृषी प्रदर्शन मोशी येथे सुरू

पुणे : भारतातील सर्वात मोठे असलेल्या किसान कृषी प्रदर्शनास बुधवार (ता. १४) पासून भोसरीजवळील मोशी येथे सुरूवात झाली. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १८) सुरू राहील. प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना येथे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान पाहता येईल. कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

पंधरा एकर परिसरात असलेल्या या कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. देशभरातील दीड लाखाहून अधिक शेतकरी प्रदर्शनास भेट देतील, असा अंदाज आहे. मिळेल.

यंदा कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, पशुधन जैव, ऊर्जा, रोपवाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल आहेत.

पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या ६० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या संशोधन संस्थांचाही कृषी प्रदर्शनात सहभाग आहे.

बाजारभाव, जलव्यवस्थापन, शेतीमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना यामध्ये आहेत. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी यावरही माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *