कागल (प्रतिनिधी सलीम शेख) : कागल येथील विराज सिटी परिसरातील पालकर स्वीट्ससमोर काल रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली.
या दुर्घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विराज सिटी परिसरातील मुख्य रस्त्यावर पालकर स्वीट्सच्या समोर गाडी पार्क केलेली होती. काल रात्रीच्या सुमारास अचानक एका वाहनातून धूर निघण्यास सुरुवात झाली आणि काही क्षणांतच आगीने धारण करत वाहनाला आपल्या कचाट्यात घेतले. धुराचे साम्राज्य पसरल्याने परिसरात एकाच घबराट उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी वाहन बघण्यास गर्दी केली होती तसेच काही वाहनाने आपला मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने गेलेत. वाहना कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आगीमध्ये वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाहनात झालेल्या शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी घटनेचा अधिक तपास सुरू असून पंचनाम्यानंतरच आगीचे अचूक कारण आणि नुकसानीचा स्पष्ट अंदाज समोर येईल.