210 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग; 30 खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
कागल : कागल तालुका शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा 2026-27 दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित ए.डी. माने इंटरनॅशनल अकॅडमी, कागल येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधून 210 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. 14,17 व 19 वर्षांखालील मुले व मुली अशा सहा गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम पाच विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन स्कूल गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन मा.श्री. बिपीन माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर मा.सौ. शिल्पा पाटील, मुख्याद्यापक श्री. प्रशांत कटारकर यांच्यासह क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व पंच उपस्थित होते.

बक्षीस वितरण समारंभ श्री. अमर साळुंखे, श्री. साठे, श्री. के. बी. चौगुले व श्री. बाबूराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. अश्विनी गाडेकर, अनुराग पाटील व महेश व्यापारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमास संस्थेचे सचिव भैय्या माने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.