शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) : शाहू हायस्कूल कागल (ता. कागल) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची मिणचे (पेठवडगांव) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयी संघातील खेळाडूंना शाळेच्या वतीने गौरवण्यात आले.

Advertisements

         शाहू हायस्कूल कागल येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात रुपेश उपाडे, विराट पाटील याच्या उत्कृष्ठ पासवर व संस्कार हासबे (कप्तान), वीरधवल चौगले , श्रेयस भारमल , अथर्व  मेटकर, साई भराडे यांच्या जोरदार स्मॅशच्या जोरावर एम आर पाटील हायस्कूल बाचणी संघाचा २५ – ८ , २५ – १२ असा लिलया पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात इनोव्हेटीव्ह पब्लिक स्कूल बोरवडे संघाचा २५ – ८ , २५ – ८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला . उंपात्य सामन्यात एम डी हायस्कूल अर्जूननगर संघावर २५ – ८ , २५ – ८ असा विजय मिळविला.

Advertisements

            संघातील खेळाडू असे : संस्कार हासबे (कप्तान ), वीरधवल चौगले, श्रेयस भारमल, अथर्व  मेटकर, विराट पाटील, साई भराडे, रुपेश उपाडे, पियुष घोटणे,  विनीत परीट, तन्मय खैरे, विश्वजीत कांबळे, समर्थ डवरी यांचा समावेश आहे.

            या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, क्रीडा शिक्षक रणजीत चव्हाण , प्रशिक्षक संभाजी मांगले, अजित गोधडे, विनोद रणवरे ,सुहास भारमल, अमित साळोखे, करण मांगले, श्रावण कळांद्रे, गजानन गोधडे, मितेश सावंत, विवेक चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, कार्यवाह आण्णासो थोरवत , प्राचार्य व्ही बी खंदारे, उपमुख्याध्यापक सुनील पोवार, उपप्राचार्य इ व्ही चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!