बातमी

जय शिवराय एन्यूकेशन सोसायटीचे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पन

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज शिंदेवाडी/ मुरगुड ता. कागल या संस्थेमध्ये बी.एस्सी. नर्सिंग विभागाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस वेग आला असून इच्छुकांनी ४ ते ६ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी आपले ऑनलाईन प्रवेश CET Code 9406 वर निश्चित करावेत. असे आवाहन संस्थेचे संस्थापक खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे.

2023- 24 या शैक्षणिक वर्षापासून मुरगुड येथे सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या कॉलेजला परवानगी मिळाली असून चार वर्षे कालावधीच्या बी.एस्सी. नर्सिंग कोर्सला मान्यता मिळाली आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी सायन्स (बी ग्रुप ) उत्तीर्ण आणि एमएचसीइटी नर्सिंग पात्र असणे आवश्यक आहे. या कोर्स नंतर विद्यार्थ्यांना भविष्याच्या उज्वल संधी खाजगी अथवा शासकीय ठिकाणी नोकरी मिळू शकते. अशी माहिती देऊन खासदार मंडलिक म्हणाले, ग्रामीण भागातील हे एकमेव कॉलेज असून यानिमित्ताने मुरगूड परिसरात संस्थेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे द्वार खुले झाले आहे. प्रथम वर्षासाठी मर्यादित 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात प्रवेश मर्यादा असून पात्र उमेदवारांनी आपला प्रवेश निश्चित करावा.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, विश्वस्त अँङ. वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, मंडलिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सुशीलाकुमारी लांबा, समन्वयक सुनील मंडलिक, प्रा. संभाजी अंगज, प्रा. उदय शेटे यांच्यासह संस्थेचे अन्य विश्वस्त उपस्थित होते.

‘जय शिवराय’चे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण!

कोल्हापूर जिल्ह्यात जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या नावाचा दबदबा असून 1960 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा सुमारे 32 शाखा कार्यरत आहेत. ‘कुणी न राहो दुर्बल अज्ञ: याचसाठी हा शिक्षण यज्ञ।” हे ब्रीद घेऊन संस्थेने डोंगराळ व दुर्गम भागात बहुतांश शाळा सुरू केल्या असून बी. एस्सी. नर्सिंग च्या निमित्ताने अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या जय शिवरायने वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *