मुंबई : ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन या सरकारी डॉक्टरांच्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. राजेश गायकवाड(जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या खजिनदारपदी कोल्हापूरचे डॉ. असिफ सौदागर आणि विभागीय सचिव म्हणून कोल्हापूरच्याच डॉ. अस्लम नायकवडी यांची निवड करण्यात आली.
डॉ. राजेश गायकवाड यांची २६ राज्यांतील १५० हून अधिक प्रतिनिधींनी बिनविरोध निवड केली असून, मुंबईत झालेल्या सेंट्रल जनरल कौन्सिल बैठक व कार्यशाळेत संघटने ने हा निर्णय जाहीर केला. मुंबईत पार पडलेल्या फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत २६ राज्यांच्या प्रतिनिधींनी या निवडींवर शिक्कामोर्तब केले.
या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या समारंभाला राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आरोग्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. त्यांची आता ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यासंघटनेचे देशभरात २६ राज्यांत दीड लाखाहून अधिक गव्हर्नमेंट डॉक्टर सभासद आहेत. संघटनेकडून मुंबईत झालेल्या या कार्यशाळेत व्हायलन्स अगेनस्ट डॉक्टर्स या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशनची सेंट्रल जनरलकौन्सिल बैठक २५ व २६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हॉटेल सोफिटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.