कागलमध्ये चार हजार दिव्यांगाना विविध उपकरणांचे वाटप
कागल (सम्राट सणगर) : दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन सुखीसमृद्ध आणि सुसह्य करण्यासाठी सतत माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्याचा आनंद फार मोठा आहे, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दिव्यांगांची सेवा तहहयात करीत राहू, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित दिव्यांगाना साहित्य वाटप मेळाव्यात पालकमंत्री श्री मुश्रीफ बोलत होते. या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते ३७०० दिव्यांग नागरिकांना श्रवणयंत्रे, वॉकर, ट्रायपॉड काठी, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल अशा उपकरणांचे वाटप झाले.
दिव्यांगांसोबत झुणका भाकर…..!
दिव्यांग साहित्य वाटप मेळाव्यात येणाऱ्या सर्व दिव्यांगांसाठी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने झुणका भाकरीचे आयोजन केले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही दिव्यांगांसमवेत झुणकाभाकर खाण्याचा आनंद घेतला.
यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, माजी नगराध्यक्ष किरणआण्णा कदम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर सुरेश कोळकी, आजरा साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ तेली, मारुतराव घोरपडे, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील, तात्यासाहेब पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, गोड साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब देसाई – मंचेकर, विजयसिंह पाटील, राजेंद्र माने, नवल बोते, प्रवीण काळबर, नेताजी मोरे, रणजीत सूर्यवंशी, बळवंतराव माने, सिद्धार्थ बन्ने, सौरभ पाटील, अंकुश पाटील, पांडूतात्या पाटील, सुनील माने, सुनील कदम, बंटी पाटील, सदानंद पाटील, पंकज खलिफ, दत्ता पाटील, संग्राम लाड आदी प्रमुख उपस्थित होते.
खूप छान माहिती दिली