बातमी

मुरगूडमध्ये ज्वेलरीच्या दुकानात कैरोटोमीटरचे उदघाटन

चोख सोन्याची वर्गीकरणासह पडताळणी

मुरगूड (शशी दरेकर) : कागल, राधानगरी व भुदरगड या तीन तालुक्यांना मध्यवर्ती असणाऱ्या मुरगूड बाजारपेठेतील सिध्दीविनायक ज्वेलर्समध्ये सोन्याची चोख परीक्षण करुन त्याचे वर्गीकरणासह विवरण करणाऱ्या मशिनचे उदघाटन आज समारंभपूर्वक करण्यात आले.

पंचक्रोशीतील खेडोपाड्यातील ग्रामीण शेतकरीवर्गातील अबालवृध्द लहान थोर बंधु भगिनीच्या सदैव भरगच्च असणाऱ्या मुरगूडच्या बाजारपेठेत आपल्या दागिनेच ओळखून त्यातील शंका निरसन होवून सोने काळे ‘ पांढरे पडण्याबरोबर सोन्याच्या पडताळणीत पारदर्शकता येणार आहे. यामूळे ग्राहकांबरोबरच, सराफ तसेच सोने तारण कर्ज वितरण करणाऱ्या बँका पतसंस्था यांना या मशिनद्वारे मदत होणार आहे व सोन्याचे योग्य व्हॅल्युएशन होईल असे या अद्ययावत शोरूम सिद्धिविनायक ज्वेलर्सचे रामदास कुडित्रे यांनी सांगितले.

या ज्वेलर्स मशिनचे उदघाटन मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पुंडलिक डाफळे ‘ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डेळेकर, श्रीकांतराव भोसले (सरकार), मारूतराव कुडीत्रे (सावकार), विनोद पाटील हे प्रमुख उपस्थितीत होते. अनेक वक्त्यांनी सिद्धिविनायक ज्वेलर्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांसह सर्व उपस्थितांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

समारंभास मुरगूड व्यापार उद्योगातील प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी नगरसेवक किरण गवाणकर, लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर पोतदार, माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नाडिस, राजू आमते, पत्रकार प्रा. रविंद्र शिंदे, पत्रकार अनिल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. आभार पुंडलिक डाफळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *