30/09/2022
1 0
Read Time:3 Minute, 24 Second

पर्यावरणाचा विध्वंस विनाशाकडे घेवून जाणारा – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सरपिराजीराव तलाव परिसरातील माळरानावरील ‘ एकटा ‘ नावाने प्रसिद्ध असलेला आंब्याचा वृक्ष रस्सा पार्टी करणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या बेफिकीरपणामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दिनांक २३ रोजी येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ मुरगूड, शाश्वत विकास चळवळ शाखा कागल तालुका ,तसेच निसर्ग मित्र मंडळ निढोरी यांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली.

अत्यंत संवेदनशील मनाने तुटलेल्या झाडाच्या बुंध्यावर फुले अर्पण करून कृतज्ञता पूर्वक या झाडास श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, जागतिक तापमान वाढ आपणास सृष्टीच्या विनाशाचा संकेत देत आहे . तरीही आपण शहाणे होण्यास तयार नाही आहोत . सजीव सृष्टीचा विनाश जवळ येत असून सुद्धा आपण पर्यावरणाचा विध्वंस थांबवलेला नाही. त्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धि असेच म्हणावे लागेल.

या शोक सभेवेळी बोलतांना वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी म्हणाले, निसर्गाप्रती मानव दिवसेंदिवस कृतघ्न बनत चालला असून, मानवांच्या पालन कर्त्या वृक्षराजींचाच मानवाने विनाश आरंभला आहे. विकासाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणातून वृक्षांची प्रचंड कत्तल सुरू झाली आहे. या ठिकाणच्या वृक्षास आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व तुटलेल्या वृक्षांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आदरांजली वाहत आहोत. हा एक प्रकारे या आंब्याचा वृक्षाचा खून झाला आहे असेच म्हणावे लागेल. या घटनेचा आम्ही सर्व निसर्गप्रेमी जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत.

यावेळी कोसळलेल्या आंब्याच्या वृक्ष्याच्या जागेसह माळावरून लोकसहभागातून वृक्षारोपण करणेचा निर्धार व्यक्त केला. या शोक सभेस सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार , माजी विस्तार अधिकारी एम टी सामंत , वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, विकास सावंत, ओमकार कांबळे, मृत्युंजय सूर्यवंशी, सुरज कांबळे , माजी नगरसेवक एम डी कांबळे, ओमकार पोतदार ,धीरज कांबळे आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!