डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य समाजाला वैज्ञानिक आणि विवेकवादी  दृष्टिकोन देणारे होते – प्राचार्य डॉ शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी वैज्ञानिक आणि विवेकवादी विचार समाजात रुजवण्यासाठी अथक प्रयत्न केले .समाजामधील अंधश्रद्धा आणि बुवाबाजी घालवण्यासाठीही आयुष्यभर डॉ. दाभोळकर यांनी लढा उभा केला. मानवी संस्कृतीचा विकास बुद्धीच्या विकासाशी निगडित आहे. त्यांचे कार्य समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे होते असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांनी केले.  

Advertisements

महाविद्यालयातील विवेक वाहिनी आणि इतिहास विभाग यांच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त  आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.होडगे बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.डाॅ.पी.आर.फराकटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रितेश रायकर यांनी केले आभार  प्रा.राम पाटील यांनी मांडले.

Advertisements

     या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.दादासाहेब सरदेसाई प्रा.सौ.माणिक पाटील प्रा.दीपक साळुंखे प्रा .एच एम सोहनी प्रा.धनाजी खतकर प्रा.संजय हेरवाडे प्रा.संदीप मोहिते प्रा स्वप्नील मेंडके पा.पाडळकर दयानंद कांबळे प्रा.मनीषा पाटील सौ .कौलकर प्रा.सौ.अर्चना कांबळे प्रा. सौ हुकेरीकर यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!