कागल शहरात रविवारी विविध विकासकामांचे लोकार्पण

कागल : कागल शहरातील पर्यटन आणि विकासाला मोठी चालना देण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

Advertisements

लोकार्पण आणि पायाभरणी होणारी प्रमुख कामे:

नूतन एसटी बसस्थानकाचे लोकार्पण: कागलच्या वैभवात भर घालणाऱ्या एसटी बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण.
कासव धबधबा व रेन डान्स: पाझर तलाव परिसरातील कृत्रिम कासव धबधबा आणि रेन डान्सच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन.
सामाजिक सभागृह: दलित वस्ती योजनेअंतर्गत बेघर वसाहतीत बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाची (समाजमंदिर हॉल) पायाभरणी.

Advertisements

नियोजन बैठकीत जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कागल नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष सौ. सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरोग्य सभापती प्रवीण काळभर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, एसटी आगाराचे अरुण लाड व इतर नगरसेवक-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!