अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नियमभंग करणाऱ्यांना कठोर इशारा; महाराष्ट्रात धडक कारवाई सुरू

FDA च्या कारवाईचे फडणवीसांकडून समर्थन; म्हणाले – ‘ही कारवाई अशीच सुरू राहील’

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरू असलेल्या जोरदार कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. मुंबईतील या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “ही कारवाई अशीच पुढे सुरू राहील.”

Advertisements

कडक कारवाई आवश्यक: देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अन्नामध्ये भेसळ किंवा अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास लोकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी थेट खेळ होतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.”

Advertisements

तुकाराम मुंडे यांना पूर्ण पाठिंबा: मे महिन्यात पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आंतरराष्ट्रीय फास्ट-फूड साखळ्या, प्रसिद्ध कॅफे आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या गोदामांवर छापे टाकून त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

हायकोर्टाची टिप्पणी: मुंडे यांच्या अति-आक्रमक पद्धतींवर आणि गोदामे थेट बंद करण्याच्या निर्णयांवर मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच सुनावणीदरम्यान “डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका” अशी टिप्पणी करत सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, सरकारने या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.

Advertisements

अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस: विमल इलायचीच्या जाहिरातीद्वारे सरोगेट (अप्रत्यक्ष) पद्धतीने पान मसाल्याची प्रसिद्धी केल्याप्रकरणी तुकाराम मुंडे यांनी अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!