बातमी

दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांना २५ लाखाची देणगी

जनतेच्या प्रेमाबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नागरिकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता……..

कागल, दि. १८:
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधातील दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरवासीयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांना 25 लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी आज ही रक्कम मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्याकडे सुपूर्द केली. जनतेच्या या प्रेमाबद्दल मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी कागल नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याबाबत अधिक माहिती अशी, किरीट सोमय्या यांनी नामदार हसन मुश्रीफसाहेब यांचेवर बिनबुडाचे व चुकीचे आरोप केल्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला. यासाठी येणाऱ्या खर्चासाठी एक नंबरचे पैसे मुश्रीफ साहेबांच्याकडे आहेत काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यामुळे जिल्ह्यातून अनेक स्तरावर कार्यकर्ते यांच्याकडून रक्कम देणगी स्वरुपात दिली गेली. कागल शहरातून २५ लाख रुपये गोळा करून देण्याची घोषणा माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी केली होती. मा. प्रकाशराव गाडेकर यांनी पुढाकार घेवून अवघ्या तीन दिवसान 25 लाख रुपयाची देणगी गोळा केली.

यावेळी आज प्रताप भैय्या माने , प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, नविद मुश्रीफ, रमेश माळी, रमेश रा. पाटील, विवेक लोटे, अजित कांबळे, नितीन दिंडे, प्रविण काळवर , सौरभ पाटील, आनंदा पसारे, बाबासाहेब नाईक,’ सतिश वड्ड , गंगाधर शेवडे, गणेश सोनुले सुरेश शिंदे,बापू घाटगे, धैर्यशील पाटील ( भुयकेर ) , महेश कुंभार , सोनु नाळे, युवराज लोहार योगेश गुरव अमोल डोईफोडे संजय चितारी अर्जुन नाईक यांचे हस्ते धनादेश मंत्री मुश्रीफ साहेब यांच्याकडे सुपूर्द केली यावी उर्फ भैया माने यांनी मनोगत व्यक्त केले व आवाहनाला प्रतिसाद देऊन देणगीसाठी मदत केल्याबद्दल सर्व देणगीदारांचे आभार माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *