बातमी

मुरगूड येथील बिरोबा मंदीर परिसरात गव्यांचा वावर

शेतकरी वर्गात भितीचे वातावरण


मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता . कागल येथील बिरोबा  मंदिराच्या परिसरामध्ये गव्याचा स्पष्ट वावर आढळलाअसून वन विभागानेही या ठिकाणी भेट देऊन त्यास दुजोरा दिला आहे. येथील बिरोबा मंदिराच्या परिसरामधील विजय सुतार हे  आपल्या शेतात पाणी पाजत असताना त्यांना बाजूच्या भागातून मोठा आवाज आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याजवळ असणाऱ्या बॅटरीच्या उजेडाचा प्रकाशझोत  टाकताच त्यांना गव्यांच कळप निदर्शनास आला आहे.

1
आम. हसन मुश्रीफाना ईडीच्या कारवाईचा फायदा होणार ?

गेले पंधरा-वीस दिवस हे गवे परिसरातील शेतामध्ये फिरून शेतात नुकसान करत आहेत . वन विभागाने त्या ठिकाणी पाहणी केली असून कापशी येथील वनपाल बळवंत शिंदे यांनी गव्यांचा वावर असल्याचे सांगितले.  गवे नागरी वस्तीत येण्याचा धोका कमी असल्याचे हेही-त्यांनी यावेळी सांगितले . सध्या जंगलामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने परिसरातील बोळावी, ठाणेवाडी, पळशिवणे, कापशी या भागात गव्यांचं कळप सहज दृष्टिक्षेपात पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे. बिरोबा मंदिरासमोरील शेतामध्ये गव्याचे पायाचे ठसे दररोज बघावस मिळत असून या ठिकाणी सध्या उसाची रोपण केली आहे या ठिकाणचे शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *