दौलतराव निकम विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर व दौलतरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सर्व पत्रकार.

व्हन्नूर : दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर (ता.कागल) येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.व्ही.जी.पोवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. यशवंतराव निकम (संस्था सेक्रेटरी) व रामचंद्र गावडे (शिक्षण विस्तार अधिकारी- पंचायत समिती कागल)हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक श्री.जे.एन. सावंत यांनी केले.

Advertisements

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व माजी आमदार दौलतराव निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पत्रकार सुरेश डोणे (प्राचार्य-व्ही.जे.पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज कंदलगाव), पत्रकार नरेंद्र बोते (दै.सकाळ) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Advertisements

याप्रसंगी नरेंद्र बोते (दै.सकाळ) , तानाजी पाटील (एस.न्यूज), नंदकुमार कांबळे(बी.न्यूज),सम्राट सणगर(संपादक-गहिनीनाथ समाचार), प्रा.सुरेश डोणे(सह्याद्री लाईव्ह,दै.हिंदूसम्राट),शिवाजी पाटील (लोकमत), विक्रांत कोरे (तरुण भारत), प्रमोद पाटील (दै. पुण्यनगरी), रवी पाटील (दै.पुढारी),आण्णाप्पा मगदूम (गहिनीनाथ समाचार),अतुल सुतार (सी.टी.इंडिया न्यूज), अजितसिंह घाटगे (साप्ताहिक करवीर), प्रमोद पाटील (पुण्यनगरी) आदी पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण निकम यांनी केले तर आभार एस.के. तिकोडे यांनी मानले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!