CBSE 10 वी आणि 12 वी पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या नियमित बोर्ड परीक्षेत एक किंवा अधिक विषयांत अपेक्षित गुण मिळाले नाहीत किंवा जे आपले गुण सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी ही परीक्षा एक सुवर्णसंधी आहे. अधिकृत घोषणेनुसार, इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षा 15 जुलैपासून सुरू होऊन … Read more

राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त … Read more

मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात राजर्षि शाहू यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघात राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले. यावेळी राजर्षि शाहू यांच्या प्रतिमेचे पूजन मारुती हरी रावण यांच्या हस्ते करून घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जमादार( पापा ) हे होते. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा . … Read more

छत्रपती शाहू यांना जयंती निमित्य मुरगूडकरांचे अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : आज शाहू जयंती निमित्त मुरगुड शहरात त्यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या जुन्या इमारती समोर असलेल्या शाहू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या इमारतीत शाहू छत्रपतींचे तीन वेळा वास्तव्य होते.   युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या कार्याबद्दल आपले मनोगत … Read more

मुरगुड नगरपालिका नोकर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत गोधडे तर व्हा.चेअरमनपदी विजय कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड नगरपालिका नोकर सहकारी पत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन संचालक  मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संस्थेच्या चेअरमन पदी जयवंत ज्ञानदेव गोधडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी विजय दत्तात्रय कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे … Read more

पिंपळगाव बुद्रुक येथे भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार

मुरगुड पोलीस ठाण्यात भीषण अपघाताची नोंद: एकाचा मृत्यू, अनेक जखमी मुरगुड, दि. २५ जून: कागल-निढोरी रस्त्यावर पिंपळगाव बुद्रुक येथे आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. एरटिका गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मुरगुड पोलिसांनी रामचंद्र अशोक शिंदे (वय ३५, रा. … Read more

तलावाचे स्वच्छ पाणी पुरवठा शहराला करावा मुरगूडच्या नागरीकांचे लेखी निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सरपिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.   महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व … Read more

MPSC च्या ऑनलाइन अर्जासाठी ‘केवायसी’ सक्तीचे; फसवणुकीला बसेल आळा

मुंबई, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन अर्ज प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे कोणताही अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व उमेदवारांना ‘केवायसी’ (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. MPSC ने दिलेल्या माहितीनुसार, आधार आधारित ऑनलाइन, ऑफलाइन डिजिटल, ऑफलाइन पेपर आधारित किंवा नॉन-आधार ऑफलाइन या चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने उमेदवारांना आपली ओळख पडताळून घ्यावी … Read more

कागल शहरात २५ एकरांवर देवराई वन उभारणार

सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प कागल, दि. २३: कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून २५ एकरांवर “देवराई वन” उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. सयाजी शिंदे यांनी कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकासकामे, हरितपट्टे, नक्षत्र बागा आदींची पाहणी केली. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याशी या  उपक्रमाबद्दल याआधीच … Read more

मुरगूडच्या सरपिराजीराव तलावाचे शिवभक्त्ताकडून पाणी पूजन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरलाआहे . कित्येक वर्षात पहिल्यांदाच एक महिना अगोदर भरलेल्या या तलावाच्या पाण्याचे पूजन शिवभक्तांनी केले. यावेळी  मंत्रोच्चारासह  विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच शहराचा जीवनसाथी असलेल्या तलावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी भूमिपूजन, आकाश पूजन, पाणी पूजन  करण्यात आले. त्यानंतर तलावास … Read more

error: Content is protected !!