साकेत अन्नपुर्णा शुगरच्या ऊस ट्रॅक्टर चे पुजन

साके(सागर लोहार): केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थीत पार पडला आहे. कारखान्याच्या प्रत्यक्ष गळपासा आता सुरूवात झाली असून कार्यक्षेत्रातील सुमारे १७ गावात कारखान्याच्या ऊसतोडण्या सुरू करण्यात आल्या आहे. त्यानिमित्त कारखान्याला पाठवत असलेल्या ऊस ट्रॅक्टरचे गावोगावी पुजन करून कारखान्याला ऊस पाठविला जात आहे.साके ता.कागल … Read more

Advertisements

कोळवण येथील कृषीकन्येकडून शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती

साके(सागर लोहार)- शेतकर्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूण कमी खर्चात जादा उत्पन्न घेणे काळाची गरज बनली आहे. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान व मोबाईल अॅप्सची माहिती कृषी महाविद्यालय राजमाची (कर्हाड) येथील सातव्या सत्रातील कृषीकन्या त्रृतूजा पांडूरंग पाटील हिने तनांच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखिवले व मार्गदर्शन केले. यावेळी शेती आधारीत प्रात्यक्षिके, जमीन व्यवस्थापन, पीक … Read more

पत्रकार प्रकाश तिराळेंचा जिल्हा परिषदेतर्फे आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून गौरव

मुरगूड : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व दै.सकाळचे मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना जिल्हापरिषदेच्या वतीने सन 2021 सालचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील सैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात जिल्हापरिषदेचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – 2021 (कागल तालुकास्तरीय ) … Read more

सीमाभागातील एस.टी वाहतूक सुरू करा गडहिंग्लज शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज – धनंजय शेटके सध्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून.महाराष्ट्र राज्यातील शाळा,महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.गडहिंग्लज हे सीमा भागातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र असून सिमा भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लज मध्ये येतात.पण सीमा भागातील एस.टी वाहतूक अजून बंदच असून याचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होत आहे.तसेच गडहिंग्लज संकेश्वर … Read more

शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मलांचा सहभाग

स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते कागल (विक्रांत कोरे) : येथील शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मल्लांनी सहभाग नोंदविला. शाहू जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी कारखाना मानधनधारक मल्ल चंद्रहार पाटील, शाहू साखर कारखान्याचे … Read more

गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप कागल : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलाही धक्कासुद्धा लागणार नाही, असेही ते म्हणाले. कागल मधील बहुउद्देशीय हॉलमध्ये … Read more

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

कागल(प्रतिनिधी): कागलमध्ये सरलादेवी माने हायस्कूलमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत फुले, शालेय साहित्य, सॅनिटायझर, मास्क, चॉकलेट देऊन स्वागत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच कोरोना महामारी अजून पूर्णता संपलेली नाही, दक्षता घेण्याचे आवाहन केले. यावेळी दि कागल एज्युकेशन संस्थेचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, मुख्याध्यापिका सौ. नंदाताई माने, सुनील माने, बिपिन माने … Read more

मुरगुड पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांची विरंगुळा केंद्रास सदिच्छा भेट

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त औचित्य साधून मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी मुक्त संवाद साधला. संघाचे संचालक जयवंतराव हावळ यांनी स्वागत केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन राव गंगापुरे यांनी संघाच्या कार्याची सविस्तर माहिती देऊन विरंगुळा केंद्र हे मुरगूड मधील … Read more

मुरगूड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संघाचे सदस्य विनायकराव हावळ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे तसेच सदस्य श्रीकांत निकम यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या … Read more

कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जैन्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकास कामांची उद्घाटने सेनापती कापशी / प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या येत्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कागल,  गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघाचा शंभर टक्के विकास करणार, असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यानंतर मतदार संघात येत्या पंचवीस वर्षात सांगायलासुद्धा काम शिल्लक असणार नाही, असेही ते  म्हणाले. जैन्याळ ता. कागल येथे  आरोग्य … Read more

error: Content is protected !!