कागल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
कागल : महाराष्ट्र महावितरण कडून वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची नियमबाह्यपणे वीज कनेक्शन तोडण्याची पुन्हा कारवाई सुरु केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन झाले होते. त्यावेळी कागल सहा. पो. नि. दीपक वाकचौरे व पी. एस. आय. संदीप गच्चे यांच्या उपस्थितीत बिलाच्या २५ टक्के रक्कम भरून घेणे व चुकीची वीज बिले दुरूस्ती करून घेणे असा तोडगा निघाला होता.
पण पुन्हा महावितरण कडून वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची पुन्हा कारवाई सुरु केली आहे. याविरोधात पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी कागल येथील महावितरण उप विभाग कार्यालयास निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर अशोक शिरोळे, उत्तम बांबरे, महदेव चौगुले, रणजीत बन्ने यांच्या सह्या आहेत.