मुरगुड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या प्रसाद व वास्तुशांती विविध धार्मिक विधी संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तू शांत सोहळ्याच्या आजच्या हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये कुमारिका पूजन पंचकन्या सवाष्ण पूजन विधी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पार पडले. यानंतर मंदिर प्रांगणामध्ये गोमातेचे पूजन करण्यात आले. मंदिरावरती उभारण्यात येणाऱ्या कलशाचे धार्मिक विधी आणि … Read more

मुरगूड येथे गणेश जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल नवी पेठ येथे ९ / २ /१९९७ रोजी प्रतिष्ठापना झालेल्या ” आत्मरुप गणेश मंदीरात ” विविध धार्मिक कार्यक्रमानी गणेश जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी “श्री ” मूर्तीस दुग्धाभिषेक,गणेशायन व पालखी सोहळा मिरवणूक मोठया भक्तीमय वातावरणात व टाळ मृदूगांच्या तालात मोठया उत्साहात पार … Read more

सक्षम कुंभार झाला १ कोटीचा मानकरी

ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड मध्ये परत एकदा ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी ठरला. या आधी मुरगूड शहरात असाच एक १ कोटीचा मानकरी झाला असून मुरगूड शहरात हि दुसरी वेळ आहे १ कोटीचे बक्षीस जिंकण्याची. यावेळी सक्षम कुंभार हा विद्यार्थी ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी झाला आहे. … Read more

सिध्दी विनायक गणेश मंदिर – तुरंबे येथे आरोग्य शिबीर संपन्न

शहीद महाविद्यालय – पंत वालावलकर हॉस्पीटल – सोंळाकूर प्राथमिक केंद्राचा चा सहभाग गारगोटी (प्रतिनिधी) – येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि पंत वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) ,रक्तगट, सामान्य चिकित्सा आणि डोळे तपासणीचे शिबीर झाले. गणेश जयंती … Read more

राज्यासह देश विदेशात व्यापक ओळख निर्माण करणारा सुमंगलम् लोकोत्सव यशस्वी साठी सर्वजण समन्वयाने काम करू- जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे

कोल्हापूर – फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि विदेशात ही कोल्हापूर शहराची अधिक व्यापक ओळख नव्याने होईल असा हा कणेरी सिद्धगिरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा आहे . तो अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे आणि त्यासाठी सर्व शासकीय कार्यालये – व स्थानिक संयोजन समितीत समन्वय साधून आपण अधिक गतीने आणि समन्वयाने कार्यरत राहू … Read more

सुभाषबाबू म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा धगधगता अंगार – आम. हसन मुश्रीफ

कागल, दि. २३: महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीचा धगधगता अंगार होय, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे क्रांतिकारक सुभाषबाबू यांच्या जयंतीनिमित्त कागल शहरातील सुभाष चौक येथील पुतळ्याला आमदार श्री. मुश्रीफ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बलिदान दिले. … Read more

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३ संपन्न

कागल : येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूलच्या केंद्रावर १४६ बालचित्रकारांनी आपल्या कल्पनेतील भावविश्व कागदावर उमटविले. प्रश्नपत्रिकेवरील विषयाशी समरस होऊन उभ्या, आडव्या रेषांनी चित्राला आकार दिला. चित्राला रंग भरल्यावर त्यात आलेला जिवंतपणा पाहून बालकलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता. निमित्त होते ‘सकाळ चित्रकला स्पर्धेचे या स्पर्धेत मुकबधीर विद्यालयाचे १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.डी. मगदूम … Read more

शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघ तर मुलींमध्ये पुण्याच्या संघ विजयी

बाचणी (प्रतिनिधी) – बाचणी ता. कागल येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघाने तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. येथील साई दिशा अकॅडमी बाचणी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींचा अंतिम सामना पुणे आणि नाशिक या विभागांमध्ये झाला यामध्ये पुणे संघाने अजिंक्यपद … Read more

खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते – आम. हसन मुश्रीफ

बाचणी / प्रतिनिधी : खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते सशक्त शरीरातच सशक्तमन कार्यरत राहते त्यामुळेच खेळ हा सरकारी नोकरी मिळण्याचा चांगला मार्ग आहे असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते बाचणी तालुका कागल येथे साई दिशा अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद … Read more

विद्यार्थीनीना त्यांच्या मनाप्रमाणे घडू द्या – पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : कन्या विद्या मंदिर मुरगुड या जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानाबरोबर कला, क्रिडा व संस्कारक्षम शिक्षण मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेवू द्या व त्यांच्या कलागुणानं वाव द्या असे स्पष्ट मत मुरगुड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी व्यक्त केले.ते कन्या विद्या मंदिर मुरगुड येथे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात … Read more

error: Content is protected !!