मुरगूडच्या शिवाजी विद्या मंदिर शाळा नंबर 2 च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय मेंडके तर उपाध्यक्षपदी रेणू सातवेकर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील शिवाजी विद्या मंदिर च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विजय कृष्णात मेंडके यांची तर उपाध्यक्षपदी सौ. रेणू राजकिरण सातवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष फौजी निशांत जाधव तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज आनिल बोटे होते. यावेळी इतर सदस्य अमर(छोटू)चौगुले, … Read more

Advertisements

कोल्हापूर जिल्हा क्रीडा विभागासाठी भरघोस निधी द्या : युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कामगिरी करत असतो कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, स्विमिंग, तिरंदाजी यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राला व देशाला या कोल्हापूर जिल्ह्यातून दिले गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा नावलौकिक आणखी वाढवायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला राज्याश्रय मोठ्या प्रमाणात मिळावा यासाठी प्रत्येक गावातील … Read more

गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी सानिका स्पोर्ट्स ठामपणे उभा – दगडू शेणवी

मुरगुड ( शशी दरेकर ) – गरीब गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फी संदर्भात जर काही अडचणी येत असतील तर मुरगुड ता. कागल येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन ठामपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे आपल्या अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्याजवळ व्यक्त केल्यास त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल मदतीचा हात सदैव पुढे राहील असे प्रतिपादन सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचे … Read more

मुरगूड कुरणी दरम्यानच्या पुलावरील खड्यात वृक्षारोपन करून आंदोलन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड कुरणी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पुलावर चार व दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीस धोकादायक असलेले हे खड्डे तातडीने पाटबंधारे उपविभाग निढोरी यांनी मुजवण्याची वांरवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ या खड्यात आज विविध सामाजिक संघटनानी वृक्षारोपन करून आंदोलन केले. मुरगूड कुरणी दरम्यान, वेदगंगा नदीवर १९६७ साली … Read more

कोनवडे येथील कवी ” गोविंद पाटील ” यांची बालकविता मराठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोनवडे ता . भुदरगड येथिल प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांच्या ” थुई थुई आभाळ ” या बालकविता संग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी ( एमए ) अभ्यासक्रमात समाविष्ठ केला आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाकडून एम ए भाग एकच्या वर्गासाठी सुधारित अभ्यासक्रम गठित केला असून अंतर्गत प्रथम सत्रासाठीच्या ” … Read more

मुरगूडमध्ये मनोहर भिडेच्या प्रतिमेस जोडे मारे आंदोलन !

मुरगूड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या मनोहर भिडे यांचा मुरगूडमध्ये समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मोरे आंदोलन केले. दलितमित्र प्रा.डी.डी. चौगले निषेध करताना म्हणाले मनुवादी प्रवृतीच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असणाऱ्या मनोहर भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी. समाजवादी प्रबोधिनी व इतर संघटनांच्या वतीने हुतात्मा … Read more

स्वाती शिंदेमूळे मुरगूडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा मुरगूडकरानां अभिमान – मुख्याधिकारी घार्गे

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वाती शिंदेने कुस्ती क्षेत्रात परिश्रमपूर्वक यश मिळविले आहे . तीला नुकताच शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार मिळाला यासह अनेक पदके मिळविली यामूळे मुरगूडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले याबद्दल मुरगूडकरांना अभिमान आहे. असे प्रतिपादन मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संदीप घागै यांनी केले. येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती … Read more

मुरगूडमध्ये जेष्ठांच्या कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाच्या सदस्याकरिता एकेरी व दुहेरी कॅरम स्पर्धा संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या. प्रथम सर्व स्पर्धकांचे स्वागत सचिव श्री .सखाराम सावर्डेकर यानीं केले. शिवराज विद्यालयाचे प्राचार्य श्री .पी डी माने यानीं कॅरम स्पर्धा कशा प्रकारे होणार याची माहिती … Read more

कागल पोलिसांकडून घरफोडयातील संशयित अटक

कागल : कागल पोलीस ठाणे हदिदमध्ये मोठया प्रमाणात चो-या होत असलेने त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करत आरोपी किशोर राजाराम नलवडे वय 26 रा. दत्त गल्ली, रामकृष्णनगर, करनुर, ता. कागल जि. कोल्हापूर यास अटक करण्यात आली आणि त्याच्या कडुन दोन घरफोडया उघड करुन रोख रक्कम 25,000/- व एअरगन, साडया, होम थेअटर असा एकुण … Read more

कंजक्टिवायटिस : डोळ्यांची काळजी घ्या

सध्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोकांना डोळ्यांची साथ येत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचा नवीन आजार समोर आला आहे, तो म्हणजे कंजक्टिवायटिस (Conjunctivitis). डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो. तसेच बॅक्टेरिया (व्हायरस) सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा … Read more

error: Content is protected !!