आमच्या शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आम्ही देणार नाही – ना. हसन मुश्रीफ

बामणी येथील विविध फंडातुन केलेल्या साडे आठ कोटीच्या विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण सिध्दनेर्ली : आमच्या शेतकरी यांचे हक्काचे पाणी आम्ही देणार नाही, तुम्ही इकडे येण्याचे धाडस करू नका असा अप्रत्यक्ष इशारा ना हसन मुश्रीफ यांनी दिला ते बामणी ता कागल येथे विविध फंडातुन केलेल्या साडे आठ कोटीच्या विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण प्रसंगी बोलत होते. अध्यक्षपदी … Read more

दक्षिण कोरिया येथील सोळाव्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चरल एक्सपो २०२३ या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना

कोल्हापूर : जेएसटीएआरसी ही कोल्हापुरातील स्वसंरक्षणासाठी तायक्वॅान्डोचे प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून जेएसटीएआरसी “कोरियाफेस्ट” अंतर्गत दक्षिण कोरीया येथील आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते व विद्यार्थ्यांना तायक्वॅान्डो मधील विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते. यावर्षी या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी श्री.अभिनव शेटे व कु.निखिल माने आणि त्यांचे मार्गदर्शक … Read more

अन्नपुर्णा शुगर येथील ध्वजारोहन वीरपत्नीच्या हस्ते

व्हनाळी (वार्ताहर) : श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे ता.कागल येथे 77 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अन्नपुर्णा कारखाना कार्यस्थळावर ध्वजाचे पुजन वीरपत्नी जयश्री जयवंत चौगले (बिद्री) यांच्या हस्ते व ध्वजारोहन चिमगाव ता.कागल येथील वीरपत्नी श्रीमती पुजा भगतसिंग एकल यांचे हस्ते झाले. समृद्धी दुध शॅापी,अन्नपुर्णा पाणी पुरवठा, इंग्लीश स्कुल चे संयुक्तीक … Read more

मुरगूड येथे विविध ठिकाणी ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध ठिकाणी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपरिषद, तुकाराम चौक, समाज मंदीर, लक्ष्मीनारायण पतसंस्था, सरपिराजी पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था, राजश्री शाहू, अष्टविनायक पतसंस्था, राणा प्रताप चौक अशा विविध ठिकाणी ध्वजारोहन पार पडले. मुरगूड -शहर जेष्ठ नागरीक संघाच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार व_संघाचे … Read more

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमा अंतर्गत माझी माती माझा देश उपक्रम नगरपरिषद हुपरी च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा

हुपरी : संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत “ माझी माती माझा देश ” हे अभियान राबविनेत येत आहे. त्यानुसार हुपरी नगरपरिषद हुपरी चे वतीने दि १४ऑगष्ट २०२३ रोजी या अभियानांचा सांगता कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. देशाचे स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मे झालेल्या स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मृतीना नमन करणे करिता सूर्य तलाव येथे शिला … Read more

श्रद्धा शिक्षण संकुल येथे संजय चितारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

कागल : 76 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रद्धा मॉडन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, श्रद्धा पब्लिक स्कूल सी.बी.एस.सी श्रद्धा प्रायमरी स्कूल, कागल येथील ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी कॉलेजचे ट्रस्टी सलीम मुजावर सर, त्यांच्या पत्नी मुजावर मॅडम व बेलेकर सर शिक्षक स्टॉप कर्मचारी शाळा व कॉलेजचे … Read more

महिला सफाई कर्मचारीच्या हस्ते ध्वजारोहण

कागल : कागल नगरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य विभागातील जेष्ठ महिला सफाई कर्मचारी श्रीमती माधवी विलास जाधव यांचे ध्वजारोहण करणेचा सन्मान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्रीराम पवार यांनी देऊन राज्यातील सर्वच सफाई महिला कर्मचारी यांना भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी सन्मानित करणेचा एक आगळा वेगळा संदेश देणेचा प्रयत्न केलेला आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सीपीआरमध्ये अतिविशेष उपचार तज्ञांची बाह्यरुग्ण सेवा सुरु

कोल्हापूर, दि. 14 : सद्यस्थितीत मधुमेह, थायरॉइड व स्थूलता इत्यादी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. या आजारांवर उपचार करण्या-या अतिविशेष उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या आजारांवर उपचार करणा-या अतिविशेष उपचार तज्ञ डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे मंगळवार … Read more

मुरगूडची व्यापारी नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी व राष्ट्रीय ” आदर्श पतसंस्था ” पुरस्कार मिळवलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुरगूडच्या श्री . लक्ष्मी -नारायण नागरी सह . पतसंस्थेच्या सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लक्ष्मी नारायण प्रतिमेचे पूजन श्री . तानाजी नाधवडेकर … Read more

लक्ष्मी मंदिर टेकडीजवळ कंटेनर मोटारची धडक

कागल : पुणे – बंगळूर महामार्गावर मोटार आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातात मोटारचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर ही दुर्घटना घडली. मुंबईतील एका कुटुंबातील काही सदस्य आजोबांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी मोटारने आंबोलीला चालले होते. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर कार अचानक फास्ट … Read more

error: Content is protected !!