साके येथे तात्काळ रोहित्र बसवावेत
ग्राममंचायतीचे महावितरणला लेखी निवेदन

व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथे गावच्या लोकसंख्येच्या गुणसुत्रानुसार गेली अनेक वर्षी जुन्या लोकवस्तीच्या आंदाजाने गावात दोन ठिकाणी महावितरणचा विद्युत पुरवठा सुरू आहे. पण सध्या गावतील वाढीव लोकवस्ती व सुमारे 800 घरगुती कनेक्शन व थ्रीफेज ची जवळपास 5 पिठाची गिरणी तसेच लोकसंख्येनुसार घरगुती इलेक्ट्रीकल्स वस्तुंचा वाढलेला वापर यामुळे गावात सिंगलफेज होणे,विद्युत पुरवठा कमी दाबाने … Read more

मुरगूड येथिल शिवराज विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या इमारतीमध्ये प्रथमच महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या इमारतीमध्ये प्रथमच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पार पडल्या. एकूण 480 परीक्षार्थ्यांची या केंद्रावर तिन मजली इमारतीमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रावर एकूण 320 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. 160 विद्यार्थी अनुपस्थित होते. अशी माहिती केंद्र संचालक व शिवराजचे प्राचार्य … Read more

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागरण अभियानाची सुरवात

कागल : विक्रांत कोरेकागल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. शिवाजीराव कांबळे यांच्या उपस्थितीत भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस पक्षाकडून आयोजित केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणां विरोधात जनजागरण अभियानाची कागल तालुका येथे सुरवात करण्यात आली. यावेळी युवराज पाटील, मनोहर हेगडे, अनिल खरटमल, पांडुरंग आवळे, अनिल कांबळे, बाबुराव बागणे, आप्पासो आंबी इ. काॅंग्रेस … Read more

मे २०२२ अखेर कालव्याचे पाणी कागलच्या जयसिंगराव तलावात येणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये कालव्यासह श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावाची केली पाहणी कागल, दि. १४: मे २०२२ पर्यंत कालव्याचे पाणी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये कालव्याच्या कामासह तलाव परिसराची पाहणी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ जिल्हापरिषद सदस्य युवराज पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी … Read more

मुरगूड नगरपरिषदेचा राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते होणार गौरव

स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ मध्‍ये देशात उच्‍चतम कामगिरी मुरगूड (शशी दरेकर) :स्‍वच्‍छ भारत अभियान, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान (नागरी) अंतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ मध्‍ये मुरगूड शहराने टॉप ३ मध्‍ये मानांकन मिळविले असून कचरामुक्‍त शहरामध्‍ये ५ स्‍टार मानांकन मिळविले आहे. या पुरस्‍कारामुळे मुरगूड शहराचा गौरव होणार असून या बद्दल कोल्‍हापूर जिल्‍हयाचे खासदार मा. संजयदादा मंडलिक यांनी समाधान व्‍यक्‍त … Read more

वाघजाई घाटात अलटो कारचा स्फोट: होरपळून कणेरी येथील तरुणाचा मृत्यू

साके : सागर लोहार कागल- निढोरी राज्यमार्गावर वाघजाई घाटामध्ये चालत्या कारचा स्फोट झाला. या स्फोटात कणेरी( ता करवीर) येथील अभिजित हणमंत धनवडे (वय ३१) हा तरुण जागीच ठार झाला. सदची घटना शुक्रवार ता १२ रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली. जळत असलेली कार घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. यामध्ये गाडी चालकाचा होरपळून मृत्यू … Read more

कागल गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुस भक्तीभावाने संपन्न

कागल(विक्रांत कोरे) :कालच्या गहिनीनाथांचा उत्सव म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक. मोठ्या भक्ती भावाने गेली चार दिवस सुरू असलेला कागल चा उरूस संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने सर्व धार्मिक उत्सवावर बंदी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धार्मिक उत्सव रद्द करण्यात झाले आहेत. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले कागलचे ग्रामदैवत गहिनीनाथ हजरत गैबीपीर ऊरुस केवळ पारंपारिक धार्मिक विधी करण्यात आले. शासनाने … Read more

गहिनीनाथ गैबी पीर चरणी मानाचा चौथा गलेफ अर्पण

कागल(प्रतिनिधी) : येथील गहिनीनाथ गैबी पीर चरणी उरूसा निमित्त मानाचा चौथा गलेफ कागल सिनियर घाटगे घराण्याचे वंशज व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी अर्पण केला. कागल येथील उरूसाचा आज मुख्य दिवस आहे. चौथा गलेफ हा मोठा म्हणून ओळखला जातो. त्याचा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व धार्मिक वातावरणात … Read more

‘अन्नपूर्णा’ च्या वतीने गैबीपीराला गलेफ अर्पण – माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह कुटूंबियांची उपस्थिती

साके : सागर लोहार दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या कागल येथील ग्रामदैवतहजरत गैबीपीर दर्गाच्या ऊरूसानिमित ‘अन्नपूर्णा’ शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे या कारखान्याच्या वतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते संचालकांच्या उपस्थितीत गलेफ अर्पण करण्यात आला. अन्नपूर्णा कारखाना व घाटगे कुटुंबियांच्या वतीने या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. काल बुधवारी … Read more

मुरगूड मधील सचिन कांबळे (गायकवाड) ड्रीम इलेव्हनचा एक कोटीचा मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : ६ नोव्हेंबर वेळ रात्री १२ ची, ड्रीम इलेव्हन चा ऑIनलाईन निकाल पाहिला. अन चक्क एक कोटीचे बक्षीस जिंकल्याचे सचिन देवबा कांबळे (गायकवाड) (वय -३१,माधवनगर, मुरगूड ) याना समजले. अन अर्धा तास त्याच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा वाहात होत्या. काय करू अन काय नको अशी परिस्थीती, पत्नी प्रियांकाला उठवल आणि ड्रीम … Read more

error: Content is protected !!