मुरगूड च्या स्मशानभूमीसच मरणकळा असल्याचे विदारक चित्र

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगुड ता.कागल येथील निढोरी पुलाजवळील स्मशानभूमीतील शेड मोडकळीस आल्याने येथील स्मशान भूमीस मरणकळा असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. मुळात नाका नंबर एक पासून तब्बल एक किलोमीटर लांब असलेले ही स्मशानभूमी सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. शेडच्या वरील लोखंडी पाईप गंजल्याने त्या केव्हाही वरच्या पत्र्यासह तुटून पडण्याची शक्यता आहे. वरचे … Read more

Advertisements

जिल्हा परिषदेच्या 10127 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर, दि. १२ : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 10 हजार, 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा … Read more

कार्यकर्त्यांच्या बाबतीत तडजोड नाही : संजयबाबा घाटगे

केनवडेत विविध संस्थांतील विजयी उमेदवारांचा सत्कार व्हनाळी(वार्ताहर) : सत्ता, साधने नसतांना अनेक राजकीय वादळी लढ्यात कार्यकर्त्यांनी साथ दिली. कार्यकर्त्यांच्या भवितव्याबाबत कोणतीच तडजोड करणार नाही. आम्ही गोकूळ दूध संघात प्रतिनिधीत्व करत असताना गोकुळने आमच्या विरोधात काम केले. नेत्यांवर आम्ही प्रेम, आदर व निष्ठेने त्यांच्या सोबत राहीलो पण लाचारी पत्करली नाही. म्हणूनच पी.एन.पाटील वगळता जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याने … Read more

एकल महिलांना रोजगार मिळून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य द्या : उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात या साथीने आपला पती दगावलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याबरोबरच या महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अनेक महिला उच्च शिक्षित आहेत त्यांना रोजगारस्वयंरोजगार मिळवून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करा. ही आपत्ती एका महायुद्धानंतर झालेल्या स्थिती समान आहे, त्यामुळे पुढील चार … Read more

केनवडे अन्नपुर्णा भैरवनाथ पत संस्थेला 25 लाख नफा

व्हनाळी (वार्ताहर) – केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्थेला चालू वर्षी 25 लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन साताप्पा तांबेकर यांनी दिली. संस्थापक मा.आम.संजयबाबा घाटगे म्हणाले, पारदर्शी कारभार व कर्मचा-यांच्या योग्य नियोजनामुळे ही संस्था अल्पावधीतच नावारूपाला आली आहे त्याबद्दल चेअरमन,व्हा.चेअरमन संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद शेतक-यांचे आभार व्यक्त केले. … Read more

गोरगरिबांच्या तळमळीतून विधायक कार्य निर्माण झाले – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागल : गोरगरीब माणसाचे स्थान माझ्या हृदयात आहे. त्या गोरगरीब माणसांच्या तळमळीतूनच माझ्या हातून विधायक काम निर्माण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील धनगर गल्लीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा संचासह अत्यावश्यक साहित्य व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अमर सनगर यांनी या … Read more

करनूर येथे राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सव साजरा

कागल ( विक्रांत कोरे): करनूर ता. कागल येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.मरिआई मंदिर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ उल्फत समीर शेख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी शंभर सेकंद कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये … Read more

मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फै,लोकराजा राजर्षि छ . शाहू महाराज याना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठ शिवप्रेमी तर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यानां शंभर व्या स्मृतिदिनानिमित्य विनंम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम श्रीमती शितल सुभाष धुमाळ यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बरोबर दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजानां मानवंदना दिली.यावेळी शिवभक्त … Read more

साके,व्हनाळी परिसरात लोकराजा शाहू महाराजाना आदरांजली

व्हनाळी(सागर लोहार) : आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त साके,व्हनाळी,केंबळी, केनवडे ता.कागल परिसरात शाहू राजांना सकाळी ठिक 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता ठेवून विविध मान्यवर, अधिकारी, सरपंच, सदस्य, विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी,ग्रामस्थांच्या उपस्थीतीत आदरांजली वाहून त्यांना … Read more

लोकराजाला आदरांजली वाहण्याचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री सतेज पाटील यांचे कोल्हापूरकरांना आवाहन

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहूया.. कोल्हापूर दि. 5 : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त 18 एप्रिल पासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 6 मे 2022 रोजी स्मृती शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्व … Read more

error: Content is protected !!