बातमी

टिश्यू कल्चरव्दारे रोपे निर्मिती व विनियोग विषयावर चर्चासत्र संपन्न

कोल्हापूर, दि. 22 : विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘टिश्यू कल्चर व्दारे रोपे निर्मिती व त्याचा विनियोग’ या विषयावर हॉटेल वृषाली येथील सभागृहात चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या अध्यक्षा प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग होत्या. कार्यक्रमास अपर प्रधान वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसरक्षक (प्रादेशिक)आर. एम. रामानुजम, सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लडकत, सामाजिक वनीकरण पुण्याचे वनसंरक्षक तुषार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती व विशेष अतिथी म्हणून West Coast पेपर मिल दांडेलीचे प्रतिनिधी श्री. यादव उपस्थित होते.

प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सिंग म्हणल्या, प्रमाणित वृक्ष प्रजातीची लागवड करून कमी कालावधीत शेतकऱ्यांना व ग्रामपंचायतींना जास्त उत्पन्न मिळावे यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व West Coast पेपर मिल यांनी संयुक्त विद्यमाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. अपर प्रधान वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची माहिती देत, लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेत जास्तीत-जास्त सामावून घेवून त्यांना पेपर मिलच्या माध्यमातून दलाल न ठेवता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम कशी वर्ग करता येईल याबाबतचे महत्व विशद करून मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी एम. बी. चंदनशिवे यांनी तर आभार एच. एस. वाघमोडे यांनी केले.
चर्चासत्रास सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *