कोल्हापूर : खटुआ समितीच्या शिफारशीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील ऑटोरिक्षांसाठी 1 ऑक्टोबर पासून सुधारित रिक्षा भाडेदर वाढ (सर्व इंधन प्रकार) साठी मंजूर केली आहे.
Advertisements
नवीन भाडेदरानुसार पहिल्या 1.1 कि.मी. साठी 27 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 24 रुपये भाडे आकारण्यात येईल. तसेच रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यत होणा-या भाडेदराच्या 50 टक्के अधिक देय राहील.
Advertisements

सर्व ऑटोरिक्षा चालकांनी आपले भाडेमीटर शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे पुर्नप्रमाणित (कॅलिब्रेशन) करून घेणे बंधनकारक आहे. कॅलिब्रेशन न करता जादा भाडे घेतल्यास मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.