गावागावात खेळांचे मैदान: क्रीडा विकासाचे दिशादर्शन

         कोल्हापूर : अद्ययावत क्रीडा संकुलाचा प्रस्ताव त्वरीत तयार करावा असे सांगून प्रत्येक गावात खेळांसाठी मैदान असावेत यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

Advertisements

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते.

Advertisements

               पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, अद्ययावत विभागीय क्रीडा संकुलासाठीचा प्रस्ताव त्वरीत तयार करावा, जिल्हा क्रीडा संकुल आणि जिल्ह्यातील अन्य क्रीडा संकुले यांच्या बळकटीकरणासाठी, अद्ययावतीकरणासाठी सुसज्जकरणासाठी सीएसआर फंडाची मदत घ्यावी. सीएसआर फंड जमा करण्यासाठी नियोजन करावेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक गावात खेळासाठी मैदान असावेत यासाठी जिल्हाधिका-यांनी त्यांच्या अधिपत्याखालील यंत्रणांना निर्देश द्यावेत व हे काम मिशन मोडवर करावेत, अशी सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

               जिल्ह्यातील तालमींसाठी निकृष्ट दर्जाचे क्रीडा साहित्य खरेदी करणा-यांवर कारवाई करण्यात येईल, यासाठी तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त करावी त्यात दोन खेळाडूंचा समावेश करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. व्यायाम शाळांच्या उभारणीसाठी 10 लाखांची असणारी मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. याबाबत मुख्यमंत्री महोदयांना पत्र देवून विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisements

              या बैठकीत श्री छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथील जलतरण तलाव कंत्राटी पध्दतीने चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे, जिल्हा क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा, मैदान वापरासाठी नियमावली, भाडे आकारणी दरास मान्यता, पार्किंग सुविधा उभारणे, शेंडा पार्क येथील जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करुन देणे या विषयांबाबत चर्चा झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!