कोल्हापुरात शिवरायांच्या कर्तृत्वाला जिवंत देखाव्यातून उजाळा

कोल्हापूर, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील एक महत्त्वाचा अध्याय, शिवराज्याभिषेक दिन, आज कोल्हापुरात कागलकर वाड्याच्या प्रांगणात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची स्थापना करण्यात आली, जी शिवरायांच्या सार्वभौमत्वाची आणि रयतेच्या कल्याणाची प्रतीक आहे. सनई आणि पोवाड्यांच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य … Read more

Advertisements

सांगाव येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ‘महाबीज’ सोयाबीन बियाणे वाटप; शेतकऱ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर: कागल तालुक्यातील सांगाव येथे शुक्रवारी कृषी विभागामार्फत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फुले किमया या उन्नत सोयाबीन वाणाच्या ‘महाबीज’ बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व … Read more

वृक्षवाढदिवस, रोपांचे वाटप, वृक्षारोपण व बियांची हवाई पेरणी आदी उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा

निसर्ग मित्र मंडळाचा सातत्यपूर्ण २९ वर्षे उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी  वृक्षांचा वाढदिवस, रोपांचे वाटप व परिसरातील डोंगर माथ्यावर बियांची हवाई पेरणी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मुरगूड नगर परिषदेचे आरोग्य विभाग व आस्थापना विभाग … Read more

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला; आता शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आता अवघ्या ८ तासांत कापता येणार आहे. या प्रसंगी बोलताना, समृद्धी महामार्गाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत, आता शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री … Read more

बोगस डीएपी खताच्या वाढत्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची गरज: शेतकऱ्यांनो, सावधान !

मुंबई: सध्या शेतीत वापरल्या जाणाऱ्या डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतामध्ये भेसळ आणि बोगस खतांची विक्री वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पिकांच्या उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होत आहे. कृषी विभागाला यावर तातडीने लक्ष देण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बोगस डीएपी खत ओळखायचे कसे? शेतकऱ्यांनी डीएपी खत खरेदी करताना … Read more

अकरावी प्रवेशाला विद्यार्थ्यांचा विक्रमी प्रतिसाद: १२.७१ लाखांहून अधिक नोंदणी !

मुंबई, दि. ५ जून, २०२५ : राज्यातील ज्युनिअर कॉलेज आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सन २०२५-२६ साठी राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आज (५ जून २०२५) अंतिम मुदत संपेपर्यंत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत आपली नोंदणी पूर्ण केली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च … Read more

अत्यंत महत्त्वाची सूचना: सैनिक वसतिगृहांमध्ये कंत्राटी पदांसाठी भरती सुरू !

कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीची सुवर्णसंधी ! कोल्हापूर ५ जून (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सैनिक वसतिगृहांमध्ये आणि सैनिक आरामगृहात अशासकीय पदांवर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सेवानिवृत्त सैनिकांना या संधीमध्ये प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुकांनी १६ जून २०२५ पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करण्याचे आवाहन … Read more

बेनिक्रे येथे एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडली

तिन्ही घरात काहीच न मिळाल्याने चोरटे हात हलवत परतले मुरगूड ( शशी दरेकर ) :  बेनिक्रे ता.कागल येथे एकाच रात्रीत तीन बंद घरांचे कडी, कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला.यामध्ये दोन घरातील तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकले तर एक घरातील कपड्यांचा ट्रंक फोडून साहित्य विस्कटून फेकले गेले आहे. या तिन्ही घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही … Read more

जागतिक साहित्य दिनाच्या अनुषंगाने मुरगुड मध्ये सायकल तिरंगा फेरीचे आयोजन

मुरगुड(शशी दरेकर) जागतिक सायकल दिनाच्या निमित्य ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेले अतुल्य शौर्य आणि शहिदांचा गौरव करण्यासाठी तिरंगा सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. मुरगुड शहरांमध्ये पर्यावरण प्रेमींच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवतीर्थ येथे जमण्याचे आवाहन सोशल मीडिया मार्फत करण्यात आले होते. यावेळी … Read more

समाजकार्यांत व विद्यार्थ्यांत सेवानिवृत्ती नंतरही इंग्रजी विषय ज्ञानदानाच्या प्रभुत्वासाठी कार्यरत रहा – आमदार जयंत आसगावकर

मडिलगे (जोतीराम पोवार) –  शाळा तसेच विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी विषया विषयी गोडी निर्माण केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही यापुढे समाजकार्यात व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानासाठी कार्यतत्पर रहा असे प्रतिपादन पुणे मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केले. ते वाघापूर ता. भुदरगड येथील वाघापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी.पाटील. यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्य मानपत्र वितरण व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी केदारर्लिंग … Read more

error: Content is protected !!