एस.डी. लाड, अशोक रोकडे व अनुराधा भोसले यांना स्व. दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

व्हँनुर (श्रध्दा सुर्वे पाटील) : कागल तालुक्याचे माजी आमदार,ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.दौलतरावजी निकम यांची ९९ वी जयंती १९ सप्टेंबरला साजरी होत आहे.या निमित्त दरवर्षी शैक्षणिक,सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना स्व.दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षी जयंती समितीच्यावतीने शैक्षणिक व्यासपीठाचे प्रमुख एस.डी.लाड सर,व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे व अवनी संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले … Read more

Advertisements

सिद्धनेर्ली येथे सार्वजनिक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय

सिद्धनेर्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सिद्धनेर्ली तालुका कागल येथील ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये चालू वर्षी सार्वजनिक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे काटेकोर पालन करत चालू वर्षी गावातील सर्व गणेश मंडळानी सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही.

आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे (धरणाचे) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व जलपूजन

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री … Read more

लाकडी बैलगाड्या होताहेत दुर्मिळ

Bullcart

शेती व्यवसाय़ात ट्रॅक्टरचा वापर वाढला; बैलजोड्यांचीही संख्या घटली साके (सागर लोहार) : राजा सर्जाची घुंगरांचा आवाज करत डौलाने धावणारी जोडी…मामाचा गाव…मातीचा रस्ता…चाकांची खडखड…मुलांचा जल्लौष…त्यावर धावणारी प्रदुषणरहित बैलाची गाडी… ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन व पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेचा एक भाग असलेली ही बैलगाडी आता काळाच्या ओघात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर धावत आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.शेता … Read more

भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे

बाळासाहेब शिंदे

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महालक्ष्मी सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. इंजूबाई मंदिर हॉल गारगोटी येथे नुकत्याच पार पडलेल्या भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मेळाव्याप्रसंगी त्यांची माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, युवानेते … Read more

सोनाळी व सावर्डे ग्रामस्थ-माहिलांचा वरदच्या आमानुष हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी मागणीसाठी मुरगूड पोलिस स्टेशनवर मोर्चा

भर उन्हात दोन्ही गावातील हजारो लोकांचा ठिय्या  अतिरिक्त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे डी वाय एस पी आर आर पाटील हे दिवसभर मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये मुरगुड (शशी दरेकर) : “क्रूरकर्मा आरोपीला फाशी द्यावी”, “खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा” अशा घोषणा देत सुमारे दोन हजार महिला पुरुष यांनी मुरगुड शहरात मोर्चा काढत तो पोलीस स्टेशन वर नेला. … Read more

फुटपाथवरील अतिक्रमणावर कागल नगरपरिषदेचा हातोडा

कागल नगरपरिषदेचा हातोडा

कागल(प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदे कडून एसटी स्टॅन्ड परिसरातील दुकानदारांची फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची जोरदार मोहीम मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आली. यावेळी काही दुकानदारांची फुटपाथवरील बेकायदेशीर बांधकामे व पत्राचे शेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आले आणि त्यातून फुटपाथ मोकळा झाला त्यावेळी दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची गाडी त्या फूटपाथवर पार्क केली जाऊन मुख्य रस्ता मोकळा झाला. नगरपरिषदेचे आरोग्य … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिळाली राज्य शासनाची इतकी मदत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानी साठी राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी पूरबाधित नागरिकांना आगाऊ मदत देण्यासाठी प्राप्त झाला आहे. तसेच लवकरच प्राप्त होणारा निधी टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे.

मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेचे संचालक ” प्रदिप वेसणेकरांचा ” वाढदिवसानिमित्य सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचीत असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन व जेष्ठ संचालक श्री. प्रदिप दत्तात्रय वेसणेकर यांचा ७३ वा वाढदिवस श्री.व्यापारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक श्री. किशोर पोतदार यांच्या शुभहस्ते अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी संचालक हाजी धोंडिराम मकानदार … Read more

error: Content is protected !!