शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मलांचा सहभाग

स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते कागल (विक्रांत कोरे) : येथील शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मल्लांनी सहभाग नोंदविला. शाहू जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी कारखाना मानधनधारक मल्ल चंद्रहार पाटील, शाहू साखर कारखान्याचे … Read more

Advertisements

गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप कागल : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलाही धक्कासुद्धा लागणार नाही, असेही ते म्हणाले. कागल मधील बहुउद्देशीय हॉलमध्ये … Read more

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

कागल(प्रतिनिधी): कागलमध्ये सरलादेवी माने हायस्कूलमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत फुले, शालेय साहित्य, सॅनिटायझर, मास्क, चॉकलेट देऊन स्वागत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच कोरोना महामारी अजून पूर्णता संपलेली नाही, दक्षता घेण्याचे आवाहन केले. यावेळी दि कागल एज्युकेशन संस्थेचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, मुख्याध्यापिका सौ. नंदाताई माने, सुनील माने, बिपिन माने … Read more

मुरगुड पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांची विरंगुळा केंद्रास सदिच्छा भेट

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त औचित्य साधून मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी मुक्त संवाद साधला. संघाचे संचालक जयवंतराव हावळ यांनी स्वागत केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन राव गंगापुरे यांनी संघाच्या कार्याची सविस्तर माहिती देऊन विरंगुळा केंद्र हे मुरगूड मधील … Read more

मुरगूड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संघाच्या विरंगुळा केंद्रात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संघाचे सदस्य विनायकराव हावळ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे तसेच सदस्य श्रीकांत निकम यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या … Read more

कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जैन्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकास कामांची उद्घाटने सेनापती कापशी / प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या येत्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कागल,  गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघाचा शंभर टक्के विकास करणार, असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यानंतर मतदार संघात येत्या पंचवीस वर्षात सांगायलासुद्धा काम शिल्लक असणार नाही, असेही ते  म्हणाले. जैन्याळ ता. कागल येथे  आरोग्य … Read more

स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम संपन्न

कागल : स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या वतीने स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम दत्तप्रसाद हॉल मुरगूड येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आईसाहेब शुभ हस्ते राजे समरजितसिंह घाटगे अध्यक्ष शाहू साखर कारखाना होते. स्वर्गीय राजे विक्रम सिंह … Read more

साके परिसरात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

साके(सागर लोहार): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय,विविध कार्यकारी सोसायट्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी मान्यवरांनी … Read more

मयुरेश जाधव ची नवोदय विद्यालय साठी निवड

मडिलगे(जोतीराम पोवार) : कुरुकली तालुका कागल येथील मयुरेश सागर जाधव यांची कागल येथील जवाहर नवोदय विद्यालय साठी नुकतीच निवड झाली तो विद्यामंदिर सोनगे तालुका कागल येथील शाळेचा विद्यार्थी आहे त्याला शाळेचे मुख्याध्यापक आण्णा पाटील, यांचे प्रोत्साहन तर शिक्षिका मंगल भोई कुरुकली येथील विद्यामंदिर हंबीरराव नगरचे मुख्याध्यापक संतोष पायमल्ले, सागर डवरी, श्री क्लासेस बेनिक्रेचे मनोज रामशे, … Read more

कागल नगरपालिकेत महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतीस अभिवादन

कागल(प्रतिनिधी): कागल नगरपालिकेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष विवेक लोटे व पालिका मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ज्येष्ठ गुरुजी श्री चौगुले सर यांच्या हस्ते … Read more

error: Content is protected !!