कागलमध्ये ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत सर्व रोग व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन

कागल (सलीम शेख) : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, कागल आणि वीर जवान मित्र मंडळ, कागल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ सप्टेंबर, २०२५ रोजी एक भव्य सर्व रोग निदान आणि नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. … Read more

निधन वार्ता – कु. सिद्धीका संदीप निंबाळकर

कु. सिद्धीका संदीप निंबाळकर वय १९ रा. कागल हिचे आकस्मित निधन झाले, त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण चुलते असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या ०७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कागल स्मशानभूमी येथे आहे

भारतीय संस्कृतीमध्ये आजही शिक्षकाना मानाचे आणि आदराचे स्थान – प्रा. रामचंद्र सातवेकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात ५ सप्टेंबर २०२५ ” शिक्षक दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक हावळ होते. प्रारंभी माजी शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत हावळ यानीं उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय प्रमुख विनायक हावळ यांचे अध्यक्ष पदासाठी … Read more

 ग. दी. माडगुळकर यांची पुस्तके – मराठी कथासंग्रह पुस्तके

ग. दि. माडगूळकर, ज्यांना प्रेमाने ‘गदिमा’ म्हणून ओळखले जाते, ते मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. ‘गीतारामायणकार’ आणि ‘महाराष्ट्राचे वाल्मीकी’ म्हणून त्यांना आदराने गौरवले जाते. त्यांची प्रतिभा केवळ गीतलेखनापुरती मर्यादित नव्हती, तर कथा, कादंबरी, पटकथा आणि आत्मचरित्र लेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. ‘बांधावरच्या बाभळी’ आणि ‘वाटेवरल्या सावल्या’ या दोन पुस्तकांचा संच गदिमांच्या साहित्यिक … Read more

एलॉन मस्क, वॉरेन बफे, बिल गेट्स: यशस्वी उद्योगपतींच्या यशोगाथा (मराठी पुस्तक परीक्षण)

“एलॉन मस्क, वॉरेन बफे, बिल गेट्स: सक्सेस स्टोरीज ऑफ पॉवरफुल बिझनेसमन कॉम्बो पॅक” हा तीन प्रेरणादायी पुस्तकांचा संच आहे. हा संच विशेषतः अशा मराठी वाचकांसाठी आहे ज्यांना जगातील यशस्वी आणि शक्तिशाली उद्योगपतींच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. या पुस्तकांमधून या तीन दिग्गजांच्या प्रेरणादायी यशोगाथा मराठीत सादर केल्या आहेत. पुस्तकांमध्ये काय आहे? हा कॉम्बो पॅक तीन … Read more

पैशाचे मानसशास्त्र (The Psychology of Money By Morgan Housel)

मॉर्गन हाऊसेल लिखित ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा ‘पैशाचे मानसशास्त्र’ या नावाने मराठी अनुवाद उपलब्ध आहे. हे पुस्तक पैसे आणि मानवी वर्तन यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर प्रकाश टाकते. पैशांशी संबंधित निर्णय घेताना आपली मानसिक स्थिती आणि दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो, हे या पुस्तकातून स्पष्ट होते. पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे … Read more

शिक्षक दिन

शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. दरवर्षी ५ सप्टेंबरला हा दिवस भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, कारण याच दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. शिक्षक दिनाचा इतिहास शिक्षक दिनाचे महत्त्व शिक्षक दिनाचा उत्सव आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन शिक्षक … Read more

दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेंतील अर्थसहाय्यत १ हजार रुपयांची वाढ

मुंबई : राज्यातील दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व इतर गरजू घटकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात तब्बल १ हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. यामुळे सध्या १५०० रुपये मिळणाऱ्या लाभार्थ्यांना आता दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत. हा नवीन दर ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. … Read more

सैन्यात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना नाशिकमध्ये मोफत प्रशिक्षणाची संधी

कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 62 साठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी उमेदवारांची निवड 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणाऱ्या मुलाखतीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक … Read more

ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोल्हापूर: जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्यास गती देण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजीच्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी ही केंद्रे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विरंगुळा केंद्र केवळ … Read more

error: Content is protected !!