अजित पवारांच्या गाडीखाली उडी मारणार – संजय पवार

मराठा समाज आक्रमक कोल्हापूर दि 5 : जालना येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात आंदोलने वाढली असून ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर मध्ये सुद्धा आज बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.तसेच येत्या 10 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सभा घेण्यासाठी येणार आहेत. … Read more

गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. राजेश गायकवाड यांची निवड

मुंबई : ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन या सरकारी डॉक्टरांच्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. राजेश गायकवाड(जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या खजिनदारपदी कोल्हापूरचे डॉ. असिफ सौदागर आणि विभागीय सचिव म्हणून कोल्हापूरच्याच डॉ. अस्लम नायकवडी यांची निवड करण्यात आली. डॉ. राजेश गायकवाड यांची २६ राज्यांतील १५० हून अधिक प्रतिनिधींनी बिनविरोध … Read more

जय शिवराय एन्यूकेशन सोसायटीचे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पन

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज शिंदेवाडी/ मुरगुड ता. कागल या संस्थेमध्ये बी.एस्सी. नर्सिंग विभागाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस वेग आला असून इच्छुकांनी ४ ते ६ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी आपले ऑनलाईन प्रवेश CET Code 9406 वर निश्चित करावेत. असे … Read more

मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी किशोर पोतदार तर व्हा . चेअरमनपदी दत्तात्रय कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२३ते २०२७ या सालाकरीता चेअरमनपदी श्री. किशोर विष्णुपंत पोतदार यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. दत्तात्रय गुंडू कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडप्रसंगी अध्यक्षपदी सहाय्यक निबंधकसो-श्री . समीर जांबोटकर हे होते. या निवडीनंतर … Read more

रविवारी कागल येथे मातंग समाज मेळाव्याचे आयोजन

नामदार हसनसो मुश्रीफ यांचा सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ कागल : कागल तालुका मातंग समाजाच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्य नामदार हसनसो मुश्रीफ यांचा सत्कार मानपत्र समारंभ व मातंग समाजातील गुणवंत व मान्यवरांचा सत्कार व मातंग समाज मेळावा रविवार दिनांक ०३/०९/२०२३ रोजी सांयकाळी ४.०० वाजता छत्रपती शाहू हॉल … Read more

अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी विनम्र भावनादींची योग्यता हवी – परमपूज्य परमात्मराज महाराज

आडी (राजकुमार पाटील) : आधुनिक शिक्षण घेण्यासाठी जशी पूर्व योग्यता हवी असते, त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी विनम्र भावनादींची योग्यता हवी असते. मनाला शांती व समाधान देणारी अध्यात्मविद्या ही सर्वोच्च आहे. असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रावण पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित … Read more

स्लॅपवरून पडून कामगाराचा मृत्यू

कागल(विक्रांत कोरे) : बांधकामाच्या स्लॅपवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडेअकरा वाजता कागल येथील येशीला पार्कमध्ये घडली. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कागल येथील येशीला पार्कमध्ये योगेश व्यवहारे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. सकाळी 11:30 वाजता इस्माईल मियालाल कलावंत, वय -वर्षे 40 राहणार- कसबा सांगाव, तालुका कागल … Read more

मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात प्रजापिता ब्रम्हाकुमारी शाखा मुरगूड यांच्या वतीने जेष्ठासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी . मगदूम यानी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे अध्यक्ष श्री . गजानन गंगापूरे यानी प्रास्ताविक करुन बहीण भावाच्या … Read more

जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी गणेशोत्सव स्पर्धेत 5 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 30 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसाकडून परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या … Read more

मुरगूड व्यापारी पेठेतील ”गणेश तरुण मंडळच्या” अध्यक्षपदी मयूर आंगज तर उपाध्यक्ष पदी मयुर बोरगावे

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील बाजार पेठेतील सुवर्ण महोत्सवी श्री गणेश तरुण मंडळाची २०२३-२४ सालासाठीच्या कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती नुकतीच पार पडली. कार्यकारीनी निवडीच्या बैठकीत मयूर आंगज यांची सर्वांनुमते अध्यक्षपदी तर मयूर बोरगावे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर श्रेणिक भैरशेठ याची खजिनदारपदी आणि सतीश माळवदे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. श्री गणेश मंडळ … Read more

error: Content is protected !!