कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या मुलींनी (कृषीकन्या) करनूर चे सर्व माहिती घेऊन रांगोळीच्या नकाशातून साकारली करणार ची प्रतिकृती. अंतिम वर्षाच्या आर.य.डब्ल्यू. ई प्रोग्राम साठी गेली अनेक दिवस कृषी कन्या करनूर येथे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी जागरूकता सत्र कार्यक्रम घेतले.
यामध्ये पी.आर.ए अभ्यासक्रम अंतर्गत मुलींनी गावातील लोकांच्या भेटीगाठी शेतकरी वर्गाच्या भेटी, तसेच गावाची सीमा, शेती, शाळा इत्यादी गोष्टी मुलांना व नागरिकांना कळाव्यात म्हणून गावाचा नकाशा रांगोळी मधून साकार केला. नकाशा हा रामकृष्ण नगर येथील विद्या मंदिर शाळेत काढण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनाही रांगोळी मधून साकारलेला गावचा नकाशा पाहून गावाची ओळख यातून झाली.
सदर उपक्रमास कृषी कन्या निहारिका शिंदे, शुभांगी वड्ड, विद्या चौगुले, श्रेया सावंत यांनी परिश्रम घेतले. तसेच पी.ओ प्रोग्राम ऑफिसर डॉ. जे.पी. भोलाने ,डॉ. बी.टी .कोलागणे यांनी कृषी कन्यांना योजने संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सरपंच सौ. रेश्मा शेख, उपसरपंच तानाजी भोसले, मा.सरपंच सौ. कविता घाटगे, सौ संगीता जगदाळे, जयसिंग घाटगे आदी उपस्थित होते.