Clara 925 Sterling Silver Heart Pendant Necklace | With or Without Chain | Gift for Women and Girls
₹1,371.00 (as of 27/04/2024 10:06 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)amazon basics Compact Size Casual Backpack | Unisex
₹329.00 (as of 27/04/2024 10:06 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ मे रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास निढोरी-कागल रोडवर शाहू कारखाना फाट्या जवळ आरोपी सुनील अशोक पाटील याने आपल्या मिनी बस भरधाव वेगाने चालवून समोरून येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली.
यात दुचाकीवरील पांडुरंग तोरस्कर यांना गंभीर दुखापत झाली, जखमी पांडुरंग तोरस्कर यांना इस्पितळात दाखल करताना त्यांचा मृत्यू झाला. सदर अपघात प्रकरणी मिनी बस चालक सुनील पाटील याच्यावर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रसाळ पुढील तपास करीत आहेत