मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड ता . कागल येथिल हिरकमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे नुतन उपसभापती शशिकांत दरेकर यांचा लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे सभापती श्री किशोर पोतदार व संचालकांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार पतसंस्थेच्या मुख्य शाखेत करण्यात आला. उपस्थितानी दरेकर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी उपसभापती दत्तात्रय कांबळे तसेच जेष्ठ संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे, अनंत फर्नांडिस, दत्तात्रय तांबट, रविंद्र खराडे, विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, जनरल मॅनेंजर नवनाथ डवरी यांच्यासह श्री व्यापारी नागरी पतसंस्थेचे सभापती किरण गवाणकर , जेष्ठ संचालक साताप्पा पाटील , व संचालक मंडळ, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुडेकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार उपसभापती दरेकर यानीं मानले.
